Agriculture news in Marathi Investigation of Talatha documents started | Agrowon

तलाठी दप्तराची झाडाझडती 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021

नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून तलाठ्यांचे दप्तर तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठी दप्तर तपासणीसाठी विविध पथके तयार केली आहेत.

जळगाव ः नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून तलाठ्यांचे दप्तर तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठी दप्तर तपासणीसाठी विविध पथके तयार केली आहेत. पथकांना निर्धारित तपासणीचा कार्यक्रम देण्यात आला आहे. 

शनिवार, रविवार म्हटला म्हणजे शासकीय सुटीचा दिवस. या दिवशी शासकीय अधिकारी, कर्मचारी निवांत असतात. मात्र, जिल्हाधिकारी अभिजित राऊत नेहमी पेंडीग कामे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन 
करताना दिसतात. असे असले तरी शनिवारी (ता. २३) जिल्हाधिकाऱ्यांनी राऊत यांनी चक्क सकाळी अकराला तलाठी दप्तर तपासणीचा कार्यक्रम आखला. अन्‌ जळगाव तहसीलदार नामदेवराव पाटील यांना सोबत घेत ते धानोरा बुद्रूक (ता. जळगाव) येथील तलाठी कार्यालयात जाऊन दप्तर तपासणी केली. अशी तपासणी सर्वत्र होणार आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक दप्तर तपासणीच्या कार्यक्रमाने सर्वच धास्तावले होते. आपलीही दप्तर तपासणी होते का? असे एकमेकांना मोबाइलद्वारे विचारणा करू लागले. काहींनी तर चक्क कार्यालयात जाऊन दप्तर तपासणीची तयारीही सुरू केली होती. जिल्हाधिकारी राऊत यांनी धानोरा बुद्रूक येथील तलाठी कार्यालयात जाऊन तलाठी सारिका दुर्गूडे यांच्याकडील दप्तराची तीन तास तपासणी केली. 

या तलाठी कार्यालयांतर्गत २५२ सातबारा उतारे आहेत. त्यांच्यावर काही नोंदी अपूर्ण आहेत का? इतर नोंदीसह इतर कामाची तपासणी केली. तपासणीत काय त्रुटी आढळल्या त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी स्वतः तयार करतील. दप्तर तपासणीवेळी तहसीलदार नामदेवराव पाटील, मंडलाधिकारी किरण बाविस्कर, नायब तहसीलदार विशाल सोनवणे आदी उपस्थित होते.


इतर अॅग्रो विशेष
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...
सत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या ...पुणे ः राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय...
‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी ...सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क...
शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३... नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी...
दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात...सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न...
स्टॉक लिमिटला नकार;  सोयाबीन बाजाराला...पुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार...
भाजीपाला,पूरक उद्योगातून महिलांची आघाडीमिरजोळी(ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) गावातील उपक्रमशील...
तुर्कांबाद खराडीत करारावर बटाटा...औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील...
शेतकऱ्यांनो एकरकमी भरा अर्धेच वीजबिल ः...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण...
राज्याच्या किमान तापमानात घट पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आकाश...
शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे -...लातूर ः आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची...
शिंदीच्या झाडांचे आता जिओ टॅगिंग  नीरा...नागपूर ः राज्य शासनाने नीरा देणाऱ्या शिंदीच्या...