वैरागमध्ये निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी खासगी कंपनीवर अखेर गुन्हा

सोलापूर : सोयाबीनचे निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांना पुरवठा करुन त्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली. तसेच आर्थिक नुकसान केले. या प्रकरणी एका खासगी बियाणे कंपनीविरुद्ध वैराग (ता.बार्शी) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  Involuntary soybean seed case in Vairag finally a crime against a private company
Involuntary soybean seed case in Vairag finally a crime against a private company

सोलापूर  : सोयाबीनचे निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांना पुरवठा करुन त्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली. तसेच आर्थिक नुकसान केले. या प्रकरणी एका खासगी बियाणे कंपनीविरुद्ध वैराग (ता.बार्शी) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी विभागाचे गुणवत्ता निरीक्षक तथा कृषि अधिकारी भारत कदम यांनी यासंबंधीची फिर्याद दिली आहे. 

याबाबतची माहिती अशी की, बार्शी तालुक्‍यातील अनेक गावात या कंपनीने मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा केला. परंतु, पेरणी केलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रारी केल्या. वैराग भागातूनच जवळपास ५९ तक्रारी कृषी विभागाकडे झाल्या. दरम्यान, तालुकास्तरीय बियाणे-तक्रार निवारण समितीच्या सदस्यांनी तक्रारीची थेट शेतावर जाऊन पाहणी केली. तेथील परिस्थितीचा पंचनामा करण्यात आला. 

दरम्यान तेव्हा कंपनी विक्री केलेले सोयाबीन बियाणे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांकडे फारच कमी उगवण झाल्याचे दिसून आले. त्याची निर्धारित उगवण क्षमता कमी दिसून आली. 

कंपनीच्या निकृष्ठ बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्यासह अर्थिक फसवणूक झाल्याचा ठपका कदम यांनी  ठेवला आहे. त्यानुसार कंपनीच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com