गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिर

गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिर
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिर

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३१) भाजीपाल्याची अवघी सुमारे १३० ट्रक आवक झाली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत आहे. परिणामी, विविध भाजीपाल्यांचे वाढलेले दर स्थिर आहेत. तर उन्हाळ्यामुळे लिंबाला मागणी वाढल्याने गोणीमागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे. 

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून सुमारे ८ टेंपो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ टेंपो शेवगा, राजस्थान येथून मटार सुमारे ५ तर गाजर सुमारे ४ ट्रक, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ट्रक कोबी, कर्नाटकमधून तोतापुरी कैरी सुमारे ४ टेंपो, बंगलोर येथून आले १ टेंपो, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ४ हजार गोणी आवक झाली होती.

महाराष्ट्र्च्या विविध भागांतील झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, टॉमेटोे सुमारे साडे तीन हजार क्रेट, कोबी ८ तर फ्लॉवर सुमारे १० टेंपो, ढोबळी मिरची ८ टेंपो,  शेवगा ३ टेंपो, तांबडा भोपळा १० टेंपो, पावटा ३ टेम्पो, चिंच सुमारे २० गोणी, तर कांदा नवीन सुमारे १२५ ट्रक आवक झाली होती. तसेच स्थानिकसह आग्रा, इंदौर येथून बटाट्याची ५० ट्रक आवक   झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा - ६०-७५, बटाटा : ८०-१३०, लसूण : २००-४०० आले : सातारी ६००-६५०, बंगलोर -५००-५५०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान -३००-५००, टोमॅटो : १५०-१८०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ३००-६००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २५०-३००, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी- ३५०-४०० पांढरी ३००- ३५०, पापडी : ३००-३५०, पडवळ : ३००-३५०, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : १००-१२०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : १५०- २००,  नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ३००- ३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : १८०-२२०, गाजर : १००-१४०, वालवर : ३००-३५०, बीट : १२०-१४०, घेवडा : ६००-६५०, कोहळा : २००-२५०, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग : ६००-६५०, पावटा : ५००-५५०, मटार : ३६०- ४००, तांबडा भोपळा : १००-१५०, चिंच अखंड - ३००-३५०, सुरण : २००-२२०,  मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख तर मेथीची सुमारे ७० हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : ७००-१०००, शेपू : ५००-७००, कांदापात : ७००-१०००, चाकवत : ५००-७००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ७००-८००, चुका : ६००-८००, चवळई : ५००-७००, पालक : ४००-६००.

फूल बाजार फुलांचे प्रती किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : -१०-२०, गुलछडी : १००-१३०, बिजली : १०-३०, कापरी : १०-३०, कागडा (बंडल) : १५०-२००, मोगरा : २००-३००, आस्टर : १२-१६, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : २०-५०, लिलि बंडल : ३-५, जर्बेरा : १०-२०, कार्नेशियन : २०-४०.

फळबाजार फळबाजारात रविवारी (ता. ३१) मोसंबी सुमारे ५५, संत्री सुमारे ५० टन, डाळिंब सुमारे २०० टन, पपई १० टेंपो, लिंबे सुमारे २ हजार गोणी, चिक्कू ३ हजार बॉक्स आणि गोणी, पेरु ४०० क्रेट, कलिंगड ३५ टेंपो, खरबूज २० टेंपो, तर विविध द्राक्षांची सुमारे २० टन आवक झाली होती. तर कोकणातून कच्च्या हापूसच्या आंब्याची सुमारे २ हजार, तर कर्नाटकमधून विविध आंब्याची सुमारे ३ हजार डाग आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे :  लिंबे (प्रती गोणी) : ५००-१०००, मोसंबी : (३ डझन) : १२०-३००,  (४ डझन ) : ३०-१३०, संत्रा : (३ डझन) १२०-३५०, (४ डझन) : ४०-१५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-८०, आरक्ता १०-४० गणेश -५-२०, कलिंगड : ५-१२, खरबूज : १०-२२, पपई : ५-१५, चिकू : १००-६००, पेरू (२० किलो) : ४००-६००, द्राक्षे : जंम्बो (१० किलो) ६००-९००. सुपर सोनाका - ८००-१२००, माणिकचमण ६००-८००, कर्नाटक आंबा - तोतापुरी (प्रती किलो) ५०-५५, बदाम-५०-६०, हापूस (२ डझन) - ६००-८५०,   पायरी (२ डझन) ३००-५००, कोकण हापूस तयार (४ ते ७ डझन) २५०० ते ५०००

मासळी गणेश पेठ येथील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी सुमारे ७ टन, खाडीची २५० किलो तर नदीच्या मासळी सुमारे दीड टन आवक झाली. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ८ टन आवक झाली होती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)  पापलेट : कापरी : १५००, मोठे १०००, मध्यम : ८००-९००, लहान ७००-८००, भिला : ६००-७००, हलवा : ६५०, सुरमई : ६००-६५०, रावस : लहान ५५०-६००, मोठा ६००-६५०, घोळ : ६००, करली : २८०, करंदी (सोललेली) : २८०, भिंग : ४००, पाला : ६००-११००, वाम : पिवळी लहान ४८० मोठे ८००, काळी : ३२०-३६०, ओले बोंबील : १००-२००,

कोळंबी ः   लहान ३२०, मोठी ४८०, जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : २४०, मांदेली : १२०, राणीमासा : २००, खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ५५०-६००,

खाडीची मासळी :   सौंदाळे : २८०, खापी २४०, नगली : लहान ३६०-५५०, तांबोशी ४८०, पालू : २८०, लेपा : लहान १००, मोठे २०० शेवटे : २४० बांगडा : लहान १६०, मोठा १८०-२००, पेडवी : १००, बेळुंजी : १६०, तिसऱ्या :१८० खुबे  १२०-१४०, तारली : १२०-१६०

नदीची मासळी :  रहू : १४०-१६०, कतला : १६०-१८०, मरळ : २८०, शिवडा : २४०, चिलापी : १२०, मांगुर : १४०, खवली : २८०, आम्ळी : ८० खेकडे : २८०, वाम : ५००. मटण :   बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०. चिकन :   चिकन : १६०, लेगपीस : १९०, जिवंत कोंबडी : १३०, बोनलेस : २६०. अंडी : गावरान : शेकडा : ६५०, डझन : ९० प्रति नग : ७.५० इंग्लिश : शेकडा : ३२५ डझन : ४८ प्रतिनग : ४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com