Agriculture news in marathi IOnion imports continue to increase Rate under pressure | Agrowon

 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 एप्रिल 2021

खानदेशात गेल्या आठवड्यात लाल कांद्याची आवक वाढली आहे. परंतु दरात घसरण सुरू असून, कोरोनामुळे बाजार समित्यांमधील रखडलेल्या लिलाव प्रक्रियेचाही फटका बसत आहे.

जळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल कांद्याची आवक वाढली आहे. परंतु दरात घसरण सुरू असून, कोरोनामुळे बाजार समित्यांमधील रखडलेल्या लिलाव प्रक्रियेचाही फटका बसत आहे. दर गेल्या चार ते पाच दिवसात क्विंटलमागे ३५० रुपयांनी घसरून प्रतिक्विंटल ६०० ते ५५० रुपये, असे आहेत.  

नंदुरबारात १५ तारखेपर्यंत बाजार बंद आहेत. धुळ्यात आठवडी बाजार बंद आहेत. प्रमुख बाजार समित्यांमध्येच कांद्याचे लिलाव सुरू आहेत. तर काही खरेदीदार थेट शिवारातून कांद्याची खरेदी करीत आहेत. कांद्याचे दर मार्चच्या सुरवातीला १६०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक होते. तर फेब्रुवारीत सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर होता.

सध्या आगाप उन्हाळ कांद्याची आवक किंवा  काढणी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील अडावद (ता. चोपडा), किनगाव येथील बाजारात लिलाव प्रक्रिया बंदावस्थेत आहे. परंतु या भागातील व्यापारी, खरेदीदार थेट शिवारातून कांद्याची खरेदी करीत असून, त्याची पाठवणूक मोठ्या खरेदीदारांकडे करीत आहेत. खरेदी सुरू आहे. पण दरांवर दबाव वाढत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

जळगाव, धुळे, पिंपळनेर (ता. साक्री) येथील बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया सुरू आहे. परंतु कोरोनामुळे लिलाव रखडत होत आहेत. जळगाव बाजार समितीत गेल्या आठवड्यात प्रतिदिन सरासरी ८०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. तर सरासरी दर प्रतिक्विंटल ६०० रुपये, असा होता. कमी दर्जाच्या कांद्याला प्रतिक्विंटल ५५० रुपये दर मिळाला. पण सध्या दर्जेदार कांदा काढणी सुरू  आहे. याची मागणीदेखील आहे. जळगावात औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड, जालना, बुलडाणा भागातूनही कांद्याची आवक होत आहे.


इतर ताज्या घडामोडी
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...