agriculture news in marathi, IRDAI Instructs Life Insurance companies to clear flood issues on priority basis | Agrowon

विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे कंपन्यांना निर्देश

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळमधील विमाधारकांच्या दाव्यांचा तातडीने निपटारा करण्याची सूचना केंद्रीय अर्थमंत्रालयाने केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान पीक विमा योजना अशा विविध विमा योजनांच्या अंतर्गत विमा धारकांनी केलेले दावे तातडीने निकाली काढावेत, असे निर्देश अर्थमंत्रालयाने आयआरडीएआयच्या माध्यमातून विमा कंपन्यांना दिले आहेत. मुसळधार पावसाने देशाच्या अनेक भागांना जोरदार तडाखा दिला आहे.

नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळमधील विमाधारकांच्या दाव्यांचा तातडीने निपटारा करण्याची सूचना केंद्रीय अर्थमंत्रालयाने केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान पीक विमा योजना अशा विविध विमा योजनांच्या अंतर्गत विमा धारकांनी केलेले दावे तातडीने निकाली काढावेत, असे निर्देश अर्थमंत्रालयाने आयआरडीएआयच्या माध्यमातून विमा कंपन्यांना दिले आहेत. मुसळधार पावसाने देशाच्या अनेक भागांना जोरदार तडाखा दिला आहे.

पूरस्थितीमुळे अनेक राज्यांमध्ये हाहाकार उडाला असून, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. अद्यापही देशातील काही राज्यांमध्ये पूरस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विमा नियंत्रक असलेल्या आयआरडीएआयकडून विमा कंपन्यांना निर्देश जारी करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे विमाधारकांनी केलेले दाव्यांची नोंदणी करून त्यातील पात्र दावे तातडीने निकाली काढावेत, असे आयआरडीएआयने म्हटले आहे.

मृतदेह न आढळल्यामुळे अनेकदा मृत्यूचे प्रमाणपत्र मिळविताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये चेन्नईत २०१५ मध्ये आलेल्या पुरावेळी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेचे पालन करावे, अशी सूचना आयआरडीएआयकडून करण्यात आली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर दर आठवड्याला किती विमा दावे निकाली काढण्यात आले याची राज्यनिहाय माहिती आयआरडीएआयकडे पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच...मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला...
खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी;...नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला...नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या...
पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा...
पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे...यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे...
लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक...चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव...
कोरोना’च्या संकटामुळे माळेगावचे गाळप...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...