इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या

तज्ज्ञांनी रावेरातील पुनखेडा शिवारातील रोगग्रस्त बागेची पाहणी केली असून, रोगग्रस्त झाडांचे नमुने पुढील तपासणीसाठी जळगाव येथील केळी संशोधन केंद्रात पाठविण्यात आले आहेत.
banana
banana

 जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात इर्व्हिनिया रॉट हा रोग आढळत आहे. त्याचा प्रादुर्भाव १५ टक्के एवढा आहे. यासंदर्भात तज्ज्ञांनी रावेरातील पुनखेडा शिवारातील रोगग्रस्त बागेची पाहणी केली असून, रोगग्रस्त झाडांचे नमुने पुढील तपासणीसाठी जळगाव येथील केळी संशोधन केंद्रात पाठविण्यात आले आहेत. नव्याने लागवड केलेल्या किंवा जूनमध्ये लागवड केलेल्या केळी बागेत या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. पुनखेडा येथील शेतकरी नीळकंठ पाटील यांच्या सुमारे तीन एकर क्षेत्रात १०० झाडांमध्ये १५ झाडे इर्व्हिनिया रॉटमुळे १०० टक्के वाया गेली आहेत. नुकसानग्रस्त झाडे काढून त्या जागी नव्याने लागवड किंवा नांग्या भराव्या लागणार आहे. झाडाची पाने पिवळी, काळी पडणे, वरचा भाग कुजणे व वाढ खुंटणे, अशी लक्षणे दिसून आली आहेत.  शेतकरी पाटील यांच्या शेतात पाल (ता.रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राचे कीड-रोग तज्ज्ञ महेश महाजन यांनी भेट दिली आहे. त्यात त्यांनी पाहणी करून हा रोग इर्व्हिनिया रॉट असल्याचे स्पष्ट केले आहे. हा रोग अतिउष्णता व इतर कारणांमुळे येऊ शकतो. शास्त्रज्ञ महाजन यांनी रावेर तालुक्यातील राझोदा व परिसरातही नव्याने लागवड केलेल्या केळी बागांमध्ये पाहणी केली असून, त्यातही काही प्रमाणात हा इर्व्हिनिया रॉट रोग दिसत आहे. शेतकरी नुकसानग्रस्त झाडे तातडीने काढून त्या जागी नव्याने लागवड करून घेत आहेत.  यामुळे नांग्या अधिक भराव्या लागत असून, पुढे उत्पादनावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया पुनखेडा (ता.रावेर) तालुक्यातील एका तीन एकर केळी बागेत इर्व्हिनिया रॉट हा रोग दिसून आला आहे. त्यावर प्रभावशाली उपाययोजना नाहीत. पिकाचे १०० टक्के नुकसान होते. त्याचे प्रमाण १५ टक्के एवढे आहे. - महेश महाजन, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, पाल (ता.रावेर, जि.जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com