agriculture news in Marathi irhvinia rot desease in banana crop Maharashtra | Page 2 ||| Agrowon

इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या

टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

तज्ज्ञांनी रावेरातील पुनखेडा शिवारातील रोगग्रस्त बागेची पाहणी केली असून, रोगग्रस्त झाडांचे नमुने पुढील तपासणीसाठी जळगाव येथील केळी संशोधन केंद्रात पाठविण्यात आले आहेत.

 जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात इर्व्हिनिया रॉट हा रोग आढळत आहे. त्याचा प्रादुर्भाव १५ टक्के एवढा आहे. यासंदर्भात तज्ज्ञांनी रावेरातील पुनखेडा शिवारातील रोगग्रस्त बागेची पाहणी केली असून, रोगग्रस्त झाडांचे नमुने पुढील तपासणीसाठी जळगाव येथील केळी संशोधन केंद्रात पाठविण्यात आले आहेत.

नव्याने लागवड केलेल्या किंवा जूनमध्ये लागवड केलेल्या केळी बागेत या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. पुनखेडा येथील शेतकरी नीळकंठ पाटील यांच्या सुमारे तीन एकर क्षेत्रात १०० झाडांमध्ये १५ झाडे इर्व्हिनिया रॉटमुळे १०० टक्के वाया गेली आहेत. नुकसानग्रस्त झाडे काढून त्या जागी नव्याने लागवड किंवा नांग्या भराव्या लागणार आहे. झाडाची पाने पिवळी, काळी पडणे, वरचा भाग कुजणे व वाढ खुंटणे, अशी लक्षणे दिसून आली आहेत. 

शेतकरी पाटील यांच्या शेतात पाल (ता.रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राचे कीड-रोग तज्ज्ञ महेश महाजन यांनी भेट दिली आहे. त्यात त्यांनी पाहणी करून हा रोग इर्व्हिनिया रॉट असल्याचे स्पष्ट केले आहे. हा रोग अतिउष्णता व इतर कारणांमुळे येऊ शकतो.

शास्त्रज्ञ महाजन यांनी रावेर तालुक्यातील राझोदा व परिसरातही नव्याने लागवड केलेल्या केळी बागांमध्ये पाहणी केली असून, त्यातही काही प्रमाणात हा इर्व्हिनिया रॉट रोग दिसत आहे. शेतकरी नुकसानग्रस्त झाडे तातडीने काढून त्या जागी नव्याने लागवड करून घेत आहेत.  यामुळे नांग्या अधिक भराव्या लागत असून, पुढे उत्पादनावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया
पुनखेडा (ता.रावेर) तालुक्यातील एका तीन एकर केळी बागेत इर्व्हिनिया रॉट हा रोग दिसून आला आहे. त्यावर प्रभावशाली उपाययोजना नाहीत. पिकाचे १०० टक्के नुकसान होते. त्याचे प्रमाण १५ टक्के एवढे आहे.
- महेश महाजन, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, पाल (ता.रावेर, जि.जळगाव)


इतर अॅग्रो विशेष
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...
राज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...
गुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...
राहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...