agriculture news in Marathi, iron rich rice for eradication of anemia, nashik, maharashtra | Agrowon

रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

नाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह मिळत असल्यामुळे महिला व बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तक्षय (अॅनेमिया) आजार दिसत आहे. या आजारावर उपाय शोधण्यासाठी खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) तज्ज्ञांनी लोहयुक्त तांदळाची निर्मिती केली आहे. या संशोधनात देवळे (जि. नाशिक) येथील  युवा संशोधक चंद्रकांत दालभगत यांचा समावेश आहे. 

नाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह मिळत असल्यामुळे महिला व बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तक्षय (अॅनेमिया) आजार दिसत आहे. या आजारावर उपाय शोधण्यासाठी खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) तज्ज्ञांनी लोहयुक्त तांदळाची निर्मिती केली आहे. या संशोधनात देवळे (जि. नाशिक) येथील  युवा संशोधक चंद्रकांत दालभगत यांचा समावेश आहे. 

खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या कृषी व अन्न अभियांत्रिकी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून चंद्रकांत दालभगत कार्यरत आहेत. या विभागातील तज्ज्ञांनी लोहयुक्त तांदूळ निर्मितीबाबत संशोधन प्रकल्प पूर्ण केला. प्रकल्पातील संशोधनाबाबत माहिती देताना चंद्रकांत दालभगत म्हणाले, की महिला आणि लहान मुलांच्यामधील रक्तक्षय व हिमोग्लोबिन कमतरतेच्या समस्येवर मात करण्यासाठी लोहयुक्त तांदूळ हा एक पर्याय असल्याने केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या शिफारशीनुसार हे संशोधन करण्यात आले. यासाठी चांगल्या दर्जाचा तांदूळ दळून त्यामध्ये लोह, फॉलिक ॲसिड आणि जीवनसत्त्व बी-१२ यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करण्यात आले.

त्यानंतर एक्सट्रूडर यंत्रामध्ये या मिश्रणावर प्रक्रिया करून पुन्हा तांदळासारखे दाणे बनविण्यात आले. आमच्या प्रयोगशाळेत सरासरी शंभर किलो प्रतिदिन उत्पादनक्षमतेचा लोहयुक्त तांदूळ निर्मितीचा प्रायोगिक प्रकल्प उभारण्यात आला आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून लोहयुक्त तांदूळ निर्मिती प्रकल्पासाठी देशी बनावटीची यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. 

लोहयुक्त तांदूळ निर्मितीसाठी प्रत्येकी १०० ग्रॅम तांदळामध्ये लोह ४२५ मिलिग्रॅम, फॉलिक ॲसिड १२५० मायक्रोग्रॅम आणि जीवनसत्त्व बी१२  हे १२.५ मायक्रो ग्रॅम असे प्रमाण ठेवले आहे. एक किलो तांदूळ बनविण्यासाठी प्रति किलो ५० रुपये खर्च येतो.  साधारणपणे ९९ किलो साध्या तांदळामध्ये एक किलो लोहयुक्त तांदूळ एकत्र करून मानवी आहारात याचा वापर करण्याची शिफारस संस्थेतील तज्ज्ञांनी केली आहे.

कृषी व अन्न अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ संशोधक डॉ. एच. एन. मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत दालभगत आणि जयश्री मजुमदार यांनी लोहयुक्त तांदळाबाबत संशोधन पूर्ण केले आहे. यासाठी आवश्यक असणारे विविध प्रयोग संस्थेच्या अन्न रसायन आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात सध्या देशात ५० टक्के महिला आणि बालकांच्या आहारात लोह कमतरतेमुळे रक्तक्षय आजार तसेच हिमोग्लोबिन कमी प्रमाणात दिसून आले आहे. त्यामुळे हे संशोधन मानवी आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारे आहे.

संशोधनाबद्दल झाला गौरव 
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते चंद्रकांत दालभगत यांना लोहयुक्त तांदळाच्या संशोधनासाठी ‘गांधीवादी युवा प्रोद्योगिकी आविष्कार २०१९’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भाषणात या संशोधनाबाबत गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमाला डॉ. रघुनाथ माशेलकर, जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ. रेणू स्वरूप, प्रा. अनिल गुप्ता, वडील गेणू दालभगत, मार्गदर्शक डॉ. एच. एन. मिश्रा, माजी सभापती रघुनाथ तोकडे, पोलिस पाटील वाळू ठवळे उपस्थित होते.

लोहयुक्त तांदळाची वैशिष्ट्ये 

  • नैसर्गिक तांदळासारखा दिसतो.
  • चांगली टिकवण आणि शिजवण क्षमता.
  • शरीरासाठी आवश्यक घटकांचा समावेश.

इतर बातम्या
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
खानदेशात कापूस पिकात मर रोग, मूळकूजजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
...अन् नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले...मुंबई  ः कोणताही अन्याय सहन करायचा नाही, या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी, नारळ, सुपारी... सिंधुदुर्ग  ः कुणी तीन लाख तर कुणी दोन...
राष्ट्रपतींनी घेतला सूतकताईचा अनुभववर्धा  ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
पीएच.डी.साठी गुरुवारी सामाईक प्रवेश...पुणे ः  राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील...
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-... भंडारा  ः विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस...
कोयना धरणातून ६७ टीएमसी पाण्याचा विसर्गसातारा : या महिन्याच्या सुरवातीपासून मुसळधार...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती विदारकऔरंगाबाद : अर्धा पावसाळा लोटला तरीही मराठवाड्यात...
बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाली १३२५...बुलडाणाः जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना...