जळगाव जिल्ह्यात कृषिपंपांना अनियमित, कमी दाबाने वीज

जळगाव जिल्ह्यात कृषिपंपांना अनियमित, कमी दाबाने वीज
जळगाव जिल्ह्यात कृषिपंपांना अनियमित, कमी दाबाने वीज

जळगाव ः शेतात मॉन्सूनपूर्व कपाशीची लागवड करण्यात आली आहे. तसेच केळीच्या बागांनादेखील पाण्याची आवश्‍यकता आहे; परंतु कृषिपंपांना अनेक दिवसांपासून अनियमित आणि कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. यामुळे कपाशीचे कोम जळत असून, केळीदेखील उन्हामुळे करपत आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी नुकताच जळगाव शहरातील दीक्षितवाडीमधील वीज कंपनीच्या कार्यालयात मोर्चा आणून आपल्या समस्या मांडल्या. तसेच नियमित वीजपुरवठ्याची मागणी केली.  जळगाव तालुक्‍यातील पिलखेडा, नांद्रा बुद्रुक व फेसर्डी, नंदगाव आदी परिसरात विजेचा पुरवठा व्यवस्थित नसल्याचे शेतकऱ्यांनी मोर्चा आणला होता. महाग बियाणे खरेदी करून कपाशीची लागवड केली आहे. परंतु विजेअभावी कपाशीला पाणी देता येत नसल्याने जमिनीतून निघणारे कोंब उन्हामुळे जळत आहेत.  वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, ''महावितरण''कडून दखल घेतली जात नाही, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. वीज कंपनीच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता संजय तडवी यांच्याकडे समस्या मांडल्या. शेतकऱ्यांचे नुकसान भरून देणार का? असा सवालदेखील शेतकऱ्यांनी केला. तसेच ही समस्या सोडविण्यात आली नाही, तर पुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. निदर्शने केल्यानंतर कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र चव्हाण, नांद्रा बुद्रुकचे सरपंच शांताराम पाटील, अमोल चौधरी, बाळकृष्ण चौधरी, राजेंद्र चौधरी, पुंडलिक पाटील, योगराज भालेराव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.  निवेदनात म्हटले आहे, की शेतातील कृषिपंपांना अनेक दिवसांपासून कमी दाबाने व अनियमित वीजपुरवठा होत आहे. तसेच दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. या समस्येबाबत विदगाव येथील महावितरणच्या उपविभाग कार्यालयातील अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली. परंतु, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे लक्ष न देता सहकार्य केले जात नाही. मुख्य म्हणजे परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशी व केळीची लागवड केली असून, विजेमुळे पिकांना पाणी देता येत नाही. महावितरणकडून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती; मात्र, तीदेखील निरुपयोगी ठरली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. पर्यायी व्यवस्था न करता कायमस्वरूपी हा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com