पाटबंधारे विभागातर्फे आजरा तालुक्‍यात पाणी अडविणे सुरू

Irrigation department starts to stop water in the Aajra taluka
Irrigation department starts to stop water in the Aajra taluka

आजरा, जि. कोल्हापूर  : ‘‘आजरा तालुक्‍यात पाटबंधारे विभागाने पाणी अडवण्यास सुरवात केली आहे. यंदा पावसाळा लांबल्याने एक महिना उशिरा पाणी अडवण्याला सुरवात झाली. कोल्हापुरी पद्धतीच्या १९ बंधाऱ्यांत सुमारे ६०० दशलक्ष घनफुटांच्या वर पाणी अडवले जाणार आहे. रब्बीसह उन्हाळी पिकांना याचा फायदा होईल,’’ असे गडहिंग्लज विभागाचे पाटबंधारे अधिकारी सुहास नाडकर्णी यांनी सांगितले.

पावसाळा संपल्यानंतर पाटबंधारे विभाग बंधाऱ्यात पाणी अडवण्यासाठी हालचाली सुरू करतो. दरवर्षी १५ ऑक्‍टोबरनंतर पाणी अडवण्यासाठी सुरवात होते. साधारणतः पंधरा दिवसांत पाणी सर्वच बंधाऱ्यांमध्ये अडवले जाते. 

नाडकर्णी म्हणाले, ‘‘पावसाळ्यात सलग चार महिने अखंडित पाऊस झाला. तालुक्‍यात ऑक्‍टोंबर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत परतीचा पाऊस होतो. यंदा परतीच्या पावसाचा काळही पंधरा दिवस लांबला. काही काळ मॉन्सूनोत्तर पाऊसही झाला. त्यामुळे हिरण्यकेशी व चित्रा नदीत पाण्याचा प्रवाह सुरू आहे. त्याचबरोबर ओढ्या, नाल्यांनाही पाणी राहिले. त्यामुळे उशिरा पाणी अडवले जात आहे.’’

सर्फनाला प्रकल्पांतर्गत हिरण्यकेशीवरील सुळेरान, देवर्डे, दाभिल व साळगाव व हिरण्यकेशीवर कर्पेवाडी, चांदेवाडी, हाजगोळी, भादवण, ऐनापूर बंधाऱ्यावर पाणी अडवण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर उचंगी प्रकल्पांतर्गत हांदेवाडी, पोश्रातवाडी, किणे, सिरसंगी (२), वाटंगी (२) श्रृंगारवाडी, एमेकोंड, कोळींद्रे या दहा बंधाऱ्यांत पाणीसाठा केला जाणार आहे. एप्रिलपर्यंत पाणी पुरवण्याचे या विभागाचे नियोजन आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com