वरुड - मोर्शी तालुक्‍यात सिंचन सुविधा होणार बळकट ः आमदार भुयार

वरुड - मोर्शी तालुक्‍यात सिंचन सुविधा होणार बळकट  ः आमदार भुयार
वरुड - मोर्शी तालुक्‍यात सिंचन सुविधा होणार बळकट ः आमदार भुयार

अमरावती  ः संत्रा उत्पादनामुळे विदर्भाचा कॅलिफोर्नीया अशी ओळख मोर्शी, वरुडची आहे. ही ओळख कायम ठेवण्यासाठी या भागात सिंचन सुविधा बळकटीकरणावर येत्या काळात भर दिला जाणार असल्याची ग्वाही आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.  मोर्शी तालुक्‍यातील रवाळा येथे ७२ लाख रुपये खर्चुन चुडामान नदीवर कोल्हापूरी बंधारा बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजनप्रसंगी आमदार भुयार बोलत होते. बंधाऱ्यामध्ये १२७ स.घ.मि. पाणीसाठा निर्माण होणार असून या बंधाऱ्याच्या माध्यमातून ४३ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अशाप्रकारे वरुड, मोर्शी तालुक्‍यातील कोल्हापूरी बंधाऱ्यांसाठी सुमारे ३ कोटी ४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भूमिपूजन सोहळ्याला मोर्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मेघना मडघे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, मोहन मडघे, अनिल डबरासे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, पंचायत समिती उपसभापती चंदू अळसपूरे, सरपंच आम्रपाली भाजीखाये डॉ. अरविंद भागवतकर, अशोक देवते, भूषण चौधरी, नामदेव आहाळे, प्रभाकर काळे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ड्रायझोनमुक्‍त करणार पाण्याचा उपसा अधिक झाल्याने मोर्शी, वरुड तालुके ड्रायझोनमध्ये आले आहेत. या भागात सद्यःस्थितीत बोअरवेल खोदण्यावर बंदी लादण्यात आली आहे. या दोन्ही तालुक्‍यात सिंचन सुविधा बळकट करीत हे तालुके ड्रायझोनमुक्‍त करण्यावर भर दिला जाईल, असेही आमदार भुयार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com