Agriculture news in Marathi, Irrigation on four thousand hectares will be done through ghose khurd dam, nagpur, maharashtra | Agrowon

गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जुलै 2019

चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे. येत्या आठ दिवसांत या भागातील शेतकऱ्यांना गोसे खुर्द प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून दिलासा देण्याचे आश्‍वासन विधानसभेचे विरोधी पक्षेनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले. 

ब्रह्मपुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, की गेल्या  वर्षी आतापर्यंत ३९० मिलिमीटर पाऊस झाला होता. या वर्षी २१० मिलिमीटर इतकाच पाऊस पडला आहे. पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, धानउत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. त्याची दखल घेत गोसे खुर्द प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे. येत्या आठ दिवसांत या भागातील शेतकऱ्यांना गोसे खुर्द प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून दिलासा देण्याचे आश्‍वासन विधानसभेचे विरोधी पक्षेनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले. 

ब्रह्मपुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, की गेल्या  वर्षी आतापर्यंत ३९० मिलिमीटर पाऊस झाला होता. या वर्षी २१० मिलिमीटर इतकाच पाऊस पडला आहे. पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, धानउत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. त्याची दखल घेत गोसे खुर्द प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

वडेट्टीवार म्हणाले, की पहिल्या टप्प्यात सुमारे चार हजार ३०० एकर शेतीला पाणी दिले जाईल. सध्या ४३ हजार एकराकरिता पूर्ण हंगामभर पुरेल एवढा जलसाठा गोसे खुर्द प्रकल्पात उपलब्ध आहे. त्यामुळे धान उत्पादकांनी घाबरून जाऊ नये. गोसे खुर्दच्या कामाला गती प्राप्त व्हावी. यासाठी या वर्षी १०७० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. जर मी पूर्ण वेळ मंत्री असतो तर सध्याचे चित्र फार वेगळे असते. एक वर्ष मंत्री असताना राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गोसे खुर्दसाठी चार हजार ९०० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. त्यामुळेच गोसखुर्दच्या कामाला गती मिळाली. २०२० च्या हंगामात ब्रह्मपुरी परिसरातील काही भागात दुबार पिकासाठी पाणी देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे गोसे खुर्द प्रकल्प या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.

बारामतीपेक्षा अधिक सिंचनक्षमता
बारामतीपेक्षा व महाराष्ट्रात सर्वांत मोठी सिंचनक्षमता ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात उपलब्ध होणार असल्याचा दावा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. ८०-८२ तलाव गोसे खुर्दच्या कालव्यांना जोडत ही सिंचनक्षमता निर्माण केली जाणार आहे.
 

इतर बातम्या
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
खानदेशात कापूस पिकात मर रोग, मूळकूजजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
...अन् नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले...मुंबई  ः कोणताही अन्याय सहन करायचा नाही, या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी, नारळ, सुपारी... सिंधुदुर्ग  ः कुणी तीन लाख तर कुणी दोन...
राष्ट्रपतींनी घेतला सूतकताईचा अनुभववर्धा  ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
पीएच.डी.साठी गुरुवारी सामाईक प्रवेश...पुणे ः  राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील...
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-... भंडारा  ः विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस...
कोयना धरणातून ६७ टीएमसी पाण्याचा विसर्गसातारा : या महिन्याच्या सुरवातीपासून मुसळधार...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती विदारकऔरंगाबाद : अर्धा पावसाळा लोटला तरीही मराठवाड्यात...
बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाली १३२५...बुलडाणाः जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना...
कोकणात नुकसानभरपाईचे वेगळे निकष लावा :...रत्नागिरी : ‘‘सांगली, कोल्हापूरप्रमाणेच कोकणातील...