टॅंकरच्या पाण्यावर द्राक्ष बागेची छाटणी

द्राक्ष बागा
द्राक्ष बागा

सांगली ः ताकारी म्हैसाळ आणि टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी टापूत येते. मग तेथून टॅंकरने पाणी उचलून बागा जगिवण्याचे काम द्राक्ष उत्पादकांनी सुरू केले आहे. या वर्षी पाऊस नाही तलाव, विहिरी कोरड्याच आहेत. त्यामुळे पाण्याचे टॅंकर सुरू आहेत. सध्या बागेची खरड छाटणी टॅंकरने पाणी घालूनच केली आहे.  आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, आणि जत तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी, कमी पाण्यावरच शेती व्यवसाय व दुग्ध व्यवसाय सुरू आहेत. सध्या पिण्याचे पाणी नाही. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. त्यातच द्राक्ष हंगाम आटोपला आहे. शेतकरी खरड छाटणीचे नियोजन करू लागला आहे. पण पाणी असल्याशिवाय छाटणी करणे कठीण आहे.     म्हैसाळ, टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू झाले आहे. परंतू हे आवर्तनाचे पाणी मुख्य कालव्याने पुढे जाते आहे. पोट कालव्यांना पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. त्यात गेल्या वर्षी पावसाने दडी मारली. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाली. परिणामी बागा जगवायच्या कशा? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला. बागा जगविण्याशिवाय पर्याय नाही. सध्या पिण्याच्या पाण्याला टॅंकर सुरू आहे. द्राक्षबागेला टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर गुरंढोरांना जागविण्यासाठी वैरण विकत घ्यावी लागतेय, स्वत:ला जगण्यासाठी धान्य विकत घ्यावे लागत आहे. या सर्व गोष्टी विकत घ्याव्या लागत असतील तर जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  कोणत्याच योजनेचा फायदा नाही  अनेक गावांना कोणत्याही योजनेचे पाणी येत नाही. पाऊस वेळेवर पडत नाही. तरीही जिद्दीने दुग्धव्यवसाय व शेतीव्यवसाय चिकाटीने तरुण करीत आहेत. योजनांचे पाणी आले तर शेती हिरवीगार होईल, अशी आशा बाळगून इथला शेतकरी बसला आहे. मात्र, पाणी नाही, त्यामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे.  खरड छाटणी दर 

  • प्रति मजुरी हजेरी ः ४०० रुपये 
  • एक झाड छाटणी ः २ रुपये
  • डॉरमेक्स पेस्ट लावण्यासह ः 
  • ३ रुपये 
  • एक एकर ः ३५०० रुपये
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com