agriculture news in Marathi, irrigation to grapes from tanker, Maharashtra | Agrowon

टॅंकरच्या पाण्यावर द्राक्ष बागेची छाटणी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 एप्रिल 2019

सांगली ः ताकारी म्हैसाळ आणि टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी टापूत येते. मग तेथून टॅंकरने पाणी उचलून बागा जगिवण्याचे काम द्राक्ष उत्पादकांनी सुरू केले आहे. या वर्षी पाऊस नाही तलाव, विहिरी कोरड्याच आहेत. त्यामुळे पाण्याचे टॅंकर सुरू आहेत. सध्या बागेची खरड छाटणी टॅंकरने पाणी घालूनच केली आहे. 

सांगली ः ताकारी म्हैसाळ आणि टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी टापूत येते. मग तेथून टॅंकरने पाणी उचलून बागा जगिवण्याचे काम द्राक्ष उत्पादकांनी सुरू केले आहे. या वर्षी पाऊस नाही तलाव, विहिरी कोरड्याच आहेत. त्यामुळे पाण्याचे टॅंकर सुरू आहेत. सध्या बागेची खरड छाटणी टॅंकरने पाणी घालूनच केली आहे. 

आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, आणि जत तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी, कमी पाण्यावरच शेती व्यवसाय व दुग्ध व्यवसाय सुरू आहेत. सध्या पिण्याचे पाणी नाही. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. त्यातच द्राक्ष हंगाम आटोपला आहे. शेतकरी खरड छाटणीचे नियोजन करू लागला आहे. पण पाणी असल्याशिवाय छाटणी करणे कठीण आहे.  
 
म्हैसाळ, टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू झाले आहे. परंतू हे आवर्तनाचे पाणी मुख्य कालव्याने पुढे जाते आहे. पोट कालव्यांना पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. त्यात गेल्या वर्षी पावसाने दडी मारली. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाली. परिणामी बागा जगवायच्या कशा? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला. बागा जगविण्याशिवाय पर्याय नाही.

सध्या पिण्याच्या पाण्याला टॅंकर सुरू आहे. द्राक्षबागेला टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर गुरंढोरांना जागविण्यासाठी वैरण विकत घ्यावी लागतेय, स्वत:ला जगण्यासाठी धान्य विकत घ्यावे लागत आहे. या सर्व गोष्टी विकत घ्याव्या लागत असतील तर जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

कोणत्याच योजनेचा फायदा नाही 
अनेक गावांना कोणत्याही योजनेचे पाणी येत नाही. पाऊस वेळेवर पडत नाही. तरीही जिद्दीने दुग्धव्यवसाय व शेतीव्यवसाय चिकाटीने तरुण करीत आहेत. योजनांचे पाणी आले तर शेती हिरवीगार होईल, अशी आशा बाळगून इथला शेतकरी बसला आहे. मात्र, पाणी नाही, त्यामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे. 

खरड छाटणी दर 

  • प्रति मजुरी हजेरी ः ४०० रुपये 
  • एक झाड छाटणी ः २ रुपये
  • डॉरमेक्स पेस्ट लावण्यासह ः 
  • ३ रुपये 
  • एक एकर ः ३५०० रुपये

इतर बातम्या
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...