Agriculture news in marathi Irrigation of over two and half lakh hectares will be irrigated in Aurangabad, Jalna, Parbhani, Beed, Osmanabad, Latur districts | Agrowon

चार प्रकल्पातून मराठवाड्यात पावणेतीन लाख हेक्‍टरवर सिंचन

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 जानेवारी 2020

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांतील मोठ्या प्रकल्पांच्या पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक औरंगाबाद येथे गुरुवारी (ता २३) पार पडली. या बैठकीत मराठवाड्यातील चार मोठ्या प्रकल्पातील उपलब्ध पाण्यानुसार २ लाख ८६ हजार हेक्‍टरवर सिंचनाचे नियोजन करण्यात आले. 

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांतील मोठ्या प्रकल्पांच्या पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक औरंगाबाद येथे गुरुवारी (ता २३) पार पडली. या बैठकीत मराठवाड्यातील चार मोठ्या प्रकल्पातील उपलब्ध पाण्यानुसार २ लाख ८६ हजार हेक्‍टरवर सिंचनाचे नियोजन करण्यात आले. 

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक. जायकवाडी, नांदूर मध्यमेश्‍वर कालवा प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्प, माजलगाव या प्रकल्पावरून सर्व पिण्याची व औद्योगिक मंजूर पाणीपुरवठा योजनांना ३१ जुलै २०२० अखेरपर्यंत पाणी पुरेल. यासह रब्बी व उन्हाळी पिकासाठी सिंचनाचे नियोजन करण्यात आले. जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरून १ लाख ६४ हजार ९०० हेक्‍टर सिंचनाचे नियोजन आहे.

नांदूर मध्यमेश्‍वर कालवा प्रकल्पावरून दोन्ही हंगामांत २२ हजार ३०० हेक्‍टर, निम्न दुधना प्रकल्पावरून १० हजार ७५० हेक्‍टर, माजलगाव प्रकल्पावरून ४६ हजार हेक्‍टर क्षेत्राचे सिंचन होईल, अशी माहिती टोपे यांनी दिली.

जायकवाडी प्रकल्पावरून नियोजित रब्बीसाठीच्या दोन आवर्तनापैकी दुसरे आवर्तन सुरू आहे. ते येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. उन्हाळी पिकासाठी १ मार्च ते १ जूनदरम्यान चार आवर्तने मिळतील. नांदूर मध्यमेश्‍वर प्रकल्पावरून रब्बीसाठी २१ फेब्रुवारी ते १३  मार्चदरम्यान एक आवर्तन, तर १ एप्रिल ते २२ जूनदरम्यान दोन उन्हाळी आवर्तनाचे नियोजन आहे.

निम्न दुधना प्रकल्पावरून रब्बीत सिंचित क्षेत्रासाठी मागणी प्राप्त होताच एक आवर्तन मिळेल. माजलगाव  प्रकल्पावरून रब्बीत १ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान दोन आवर्तने, तर १२ मार्च ते २१ जूनदरम्यान उन्हाळी पिकांसाठी चार आवर्तने मिळतील, असे टोपे म्हणाले. 
नांदूर-मधमेश्‍वर कालव्यावर शहापूर व नाशिकच्या पाणीपुरवठा योजनांचे आरक्षण हटवावे, अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी केली.

प्रशांत बंब व या परिसरातील शेतकऱ्यांनीही ही मागणी रेटून धरली. त्यावर टोपे यांनी फेरविचारासाठी शासनाकडे मागणी लावून धरू, असे स्पष्ट केले. नांदूर-मधमेश्‍वर कालवा क्षेत्रातील वालदेवी, वाम, वाकी, बहुली आणि मुकणे या धरणांतील पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला, असे टोपे यांनी सांगितले. 

गोदावरी खोरे महामंडळातील ७० टक्के पदे रिक्त

गोदावरी खोरे महामंडळातील सुमारे ७० टक्के पदे रिक्त आहेत. निवृत्त व कौशल्य असलेल्या तरुणांना कंत्राटी पद्धतीने यावर संधी देण्याचा विचार करणे गरजेचे आहे. वसुलीच्या ७५ टक्के निधीतून कालव्याची दुरुस्ती व देखभाल शक्‍य होईल. सिंचन लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कालव्यातून पाणी मिळावे, यासाठी चारी, लघुचारीतील गवत आणि फुटलेल्या चाऱ्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

  • जायकवाडीतून रब्बीसाठी दोन, उन्हाळीसाठी चार आवर्तने
  • नांदूर-मध्यमेश्‍वरमधून रब्बीसाठी एक, उन्हाळीसाठी दोन आवर्तने
  • निम्न दुधनातून रब्बीसाठी एक आवर्तन
  • माजलगावमधून रब्बीसाठी दोन, उन्हाळीसाठी चार आवर्तने

इतर ताज्या घडामोडी
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...