असे करा वाढीच्या अवस्थेनुसार गहू पिकातील पाण्याचे नियोजन

Irrigation Planning in wheat crop according to their growth stage  
Irrigation Planning in wheat crop according to their growth stage  

गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी योग्य पाणी व्यवस्थापनाचा अवलंब करताना लागवड खर्चात फारशी वाढ न होता नेमक्या व्यवस्थापन कौशल्याच्या आधारे गव्हाच्या उत्पादनात साधारणपणे २० टक्के वाढ सहज शक्य आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू पिकाला पाण्याच्या पाळ्या देण्याचे व्यवस्थापन करावे.  गव्हाच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या अनेक घटकांपैकी पाणी हा एक महत्त्वाचा घटक असून पेरणीनंतर साधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पिकाला पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 

जमिनीनुसार पाण्याच्या पाळ्या 

  • भारी जमिनीकरिता १८ दिवसांच्या अंतराने ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.   
  • मध्यम जमिनीकरिता १५ दिवसांच्या अंतराने ७ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.  
  • हलक्या जमिनीकरिता १० ते १२ दिवसांच्या अंतराने ८ ते १० पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.  
  • पीकवाढीच्या ज्या प्रमुख अवस्था/ महत्त्वाच्या किंवा संवेदनशील अवस्था आहेत, त्या अवस्थांत पिकास पाणी देणे महत्त्वाचे ठरते. 

  • मुकुटमुळे फुटण्याची अवस्था - पेरणीनंतर १८ ते २१ दिवसांनी   
  • कांडी धरण्याची अवस्था - पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी   
  • फुलोरा व चीक भरण्याची अवस्था - पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी   
  • दाणे भरण्याची अवस्था - पेरणीनंतर ८० ते ८५ दिवसांनी   
  • अपुरा पाणीपुरवठा असल्यास काही ठरविक वेळेलाच पाणी देणे शक्य असेल, तर पाण्याच्या पाळ्या पुढीलप्रमाणे द्याव्यात.

    अ) एक पाणी उपलब्ध असल्यास  
     मुकुटमुळे फुटण्याची अवस्था  पेरणीनंतर १८ ते २१ दिवसांनी
    ब) दोन पाणी उपलब्ध असल्यास
    १) मुकुटमुळे फुटण्याची अवस्था  पेरणीनंतर १८ ते २१ दिवसांनी
    २) कांडी धरण्याची अवस्था  पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी
    क) तीन पाणी उपलब्ध असल्यास 
    १) मुकुटमुळे फुटण्याची अवस्था  पेरणीनंतर १८ ते २१ दिवसांनी
    २) कांडी धरण्याची अवस्था   पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी
    ३) दाणे चिकात भरण्याची अवस्था   ७५ ते ८० दिवसांनी 
    ड) चार पाणी उपलब्ध असल्यास 
    १) मुकुटमुळे फुटण्याची अवस्था  पेरणीनंतर १८ ते २१ दिवसांनी 
    २) फुटवे येण्याची अवस्था  पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी,
    ३) कांडी धरण्याची अवस्था  पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी,
    ४) दाणे चिकात भरण्याची अवस्था   ७५ ते ८० दिवसांनी 
    इ) पाच पाणी उपलब्ध असल्यास 
    १) मुकुटमुळे फुटण्याची अवस्था  पेरणीनंतर १८ ते २१ दिवसांनी
    २) फुटवे येण्याची अवस्था  पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी
    ३) कांडी धरण्याची अवस्था  पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी
    ४) पीक फुलोऱ्यात असताना  पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी
    ५) दाणे चिकात भरण्याची अवस्था  ७५ ते ८० दिवसांनी 
    फ) सहा पाणी उपलब्ध असल्यास 
    १) मुकुटमुळे फुटण्याची अवस्था  पेरणीनंतर १८ ते २१ दिवसांनी
    २) फुटवे येण्याची अवस्था   पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी
    ३) कांडी धरण्याची अवस्था  पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी
    ४) पीक फुलोऱ्यात असताना  पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी
    ५) दाणे चिकात भरण्याची अवस्था  पेरणीनंतर ७५ ते ८० दिवसांनी
    ६) दाणे पक्व होताना  पेरणीनंतर ९० ते ९५ दिवसांनी 

    अपुरा पाणीपुरवठा असलेल्या स्थितीत एक किंवा दोन पाणी उपलब्ध असलेल्या क्षेत्रात पंचवटी (एनआयएडब्लू १५) किंवा नेत्रावती (एनआयएडब्लू १४१५) या गव्हाच्या वाणांचा वापर करावा. गव्हास एकच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४१ टक्के घट आढळते, तर दोन पाणी दिले तर उत्पादनात २० टक्के घट आढळते. संपर्कः प्रा. विजय जाधव, ९७६६९७९२४३ (डॉ. बाबासाहेब चांगदेव वाळूंजकर कृषी महाविद्यालय, सोनई, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com