जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडे

जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडे
जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडे

जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये समाविष्ट असलेल्या गिरणा व वाघूर धरणांतील साठा २१ टक्‍क्‍यांपर्यंत आला आहे. या प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी झाल्याने चिंता वाढली आहे. पुढे पिण्याच्या पाण्यासह उद्योगांना या प्रकल्पांमधून पुरेसे पाणी उपलब्ध होण्याविषयी स्थिती चिंताजनक आहे.  

पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा धरणातून तिसरे आवर्तन १५ मार्च रोजी सोडण्यात आले. आता चौथ्या आवर्तनासाठी प्रतीक्षा आहे. परंतु घटता जलसाठा लक्षात घेऊन प्रशासन तिसरे आवर्तन सोडण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याविषयी प्रश्‍न उपस्थित होत आहे. हतनूर प्रकल्प १०० टक्के भरला होता. वाघूर व गिरणामध्ये अनुक्रमे ४६ व ४७ टक्के जलसाठा होता. हा साठा झपाट्याने कमी झाला आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमधील एकूण जलसाठा १२ टक्केही नाही. 

वाघूरमधून फक्त एकदाच शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले. नंतर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली, परंतु दुसरे आवर्तन सोडण्यात आले नाही. सद्यःस्थितीत वाघूर धरणाच्या पाण्यावर जळगाव व जामनेर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आरक्षण आहे. यामुळे शेतीसाठी पाणी या धरणातून मिळणार नाही, असे चित्र आहे. तापी नदीवरील मुक्ताईनगर तालुक्‍यानजीकच्या हतनूर धरणातूनही रब्बीसाठी आवर्तनाची मागणी केली जात होती. पण जलसाठा ३८ टक्‍क्‍यांपर्यंत आल्याने पाणी शेतीसाठी देणे शक्‍य नाही. 

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये रावेरातील सुकी, अभोरा व मंगरूळचा समावेश आहे. या तीन्ही प्रकल्पांमध्येही ६० टक्‍क्‍यांपर्यंत जलसाठा आहे. चोपडानजीकच्या अनेर प्रकल्पातून रब्बीसाठी दोन आवर्तने सोडण्यात आली आहेत. यातही सद्यःस्थितीत ५५ टक्के जलसाठा आहे. चोपडामधील गूळ प्रकल्पातून नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. या प्रकल्पात सुमारे ५० टक्के जलसाठा आहे.

मन्याड प्रकल्प आटला  जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील चाळीसगावमधील मन्याड प्रकल्प कोरडाठाक आहे. पाचोरामधील बहुळा, पारोळा व एरंडोललगतचे अंजनी, भोकरबारी, बोरी हे प्रकल्पदेखील कोरडेच आहेत. अग्नावती व हिवरामध्ये अनुक्रमे सुमारे १८ व ५ टक्के जलसाठा आहे. जामनेरातील तोंडापूर प्रकल्प पाच टक्के भरला होता. त्यातही शून्य टक्के साठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com