Agriculture news in marathi Irrigation projects in Khandesh filled up | Page 2 ||| Agrowon

खानदेशातील सिंचन प्रकल्प भरले

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

जळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने काही प्रकल्पांचा अपवाद वगळता बहुसंख्य मोठे व मध्यम, लघु प्रकल्प भरले आहेत. 

जळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने काही प्रकल्पांचा अपवाद वगळता बहुसंख्य मोठे व मध्यम, लघु प्रकल्प भरले आहेत. धुळ्यातील लहान, मोठे ४७ प्रकल्प भरले आहेत. जळगाव जिल्ह्यातही फक्त भोकरबारी, अंजनी वगळता इतर प्रकल्प भरले आहेत. 

जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील मंगरूळ, अभोरा, सुकी व गारबर्डी हे प्रकल्प भरले आहेत. यावलमधील मोर प्रकल्पातील साठाही ९२ टक्के आहे. त्यात आवक कायम असल्याने त्याचे दोन दरवाजे उघडे आहेत. भुसावळ तालुक्यानजीक तापी नदीवरील हतनूर प्रकल्पातील साठा ७५ टक्के आहे. त्यात आवक वाढल्याने त्याचेही १२ दरवाजे उघडले आहेत. पारोळ्यातील भोकरबारी प्रकल्पात मागील महिन्यापर्यंत अल्प जलसाठा होता. त्यात आता गिरणा नदीच्या जामदा कालव्याद्वारे पाणी सोडले आहे.

त्यातील साठा ५५ टक्क्यांवर पोचला आहे. एरंडोल तालुक्यातील अंजनी प्रकल्पातील साठा ८३ टक्के आहे. चाळीसगावमधील मन्याड, जामनेरातील तोंडापूर, वाघूर, पाचोऱ्यातील बहुळा, हिवरा, अग्नावती हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. 

जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे गिरणा नदीवरील गिरणा धरणही १०० टक्के भरले आहेत. त्याद्वारे रब्बीमध्ये ५१ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. 

नंदुरबारमीधल दरा, रंगावली, सुसरी तुडुंब 

तापी नदीवरील धुळ्यातील सुलवाडे बॅरेज व नंदुरबारमधील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमध्येही पाण्याची आवक होत आहे. या प्रकल्पांमधूनही विसर्ग सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातील दरा, रंगावली, सुसरी हे प्रकल्प भरले. धडगाव तालुक्यातील उदय, तळोदा-अक्कलकुवातील खरडी, शहादामधील सुसरी, गोमाई या नद्यांना चांगले प्रवाही पाणी आहे. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उकाडा वाढण्यास सुरूवात  पुणे ः परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार...
पीकविमा परतावा तात्काळ द्या, अन्यथा...अमरावती : जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (ॲग्रिकल्चर...
कापूस उत्पादनात मोठी घट, पीक परवडेनाजळगाव ः अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली....
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
‘कडकनाथ’ कुक्कुटपालनात निर्माण केल्या...आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १००...
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...