Agriculture news in marathi irrigation for Rabbi is difficult in Jalna district | Agrowon

जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडच

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 डिसेंबर 2019

कालव्याची दुरुस्ती थातूरमातूर करून उपयोग नाही. अनेक ठिकाणी बुडाला मोठे नळे पडले आहेत. पाण्याचा अपव्यय होण्याची शक्‍यता जास्त आहे. मुख्य कालव्याची ही अवस्था, तर वितरिकेची काय अवस्था असेल, याची कल्पना करता येईल, शासन व प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे.
- सुरेश काळे, जिल्हा उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जि. जालना.

जालना :  जायकवाडी प्रकल्पावरून कालव्याद्वारे केल्या जाणाऱ्या सिंचनांची वाट अवघडच असल्याचे चित्र आहे. पाणी अखेरपर्यंत जावे म्हणून केली जाणारी तात्पुरती डागडुजी या कालव्यातून होणाऱ्या सिंचनावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे. 

जलसंपदा विभागाच्या जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून यंदा प्रकल्प तुडुंब भरल्यानंतर नियमांच्या आधीन राहून रब्बी व उन्हाळी पिकांसाठी आवर्तनाचे नियोजन झाले. त्यानुसार रब्बीसाठी तीन आवर्तने सोडली जातील. १५ डिसेंबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२० दरम्यान ही आवर्तने सोडली जातील. दोन आवर्तनांमध्ये साधारणत: आठवड्याचे अंतर असेल. हो-नाही म्हणत पाणी सोडण्यासाठी चाचणी मुहूर्त ११ डिसेंबरचा काढण्यात आला. त्यानंतर १५ डिसेंबरपासून सिंचनासाठी पाणी सोडले जाणार आहे. 

२०८ किलोमिटर अंतराच्या डाव्या, तर १३२ किलोमिटर अंतराच्या उजव्या कालव्यांद्वारे नियोजनानुसार पाणी सोडले जाणार आहे. परंतु जिल्ह्यातील वडीगोद्री शिवारात कालव्याची झालेली अवस्था पाणी शेवटपर्यंत पोचण्यात किती अडथळे आहेत, हे दर्शविण्यासाठी पुरेशी आहे. अशीच अवस्था कमी अधिक प्रमाणात डाव्या व उजव्या कालव्याची आहे.

नियोजनानुसार पाणी सोडण्यासाठी गाळ काढणे, गवत काढणे, दरवाजांची दुरुस्ती, मुख्य कालव्यात खचलेला भराव बाजूला करणे आदी कामे केली व काही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कालव्याच्या आतील साइडची उखळलेली सिमेंटची, अनेक ठिकाणी उखळलेल्या साइडच्या फाड्या, बाजू दुरुस्त झाली नाहीत. सोडल्या जाणाऱ्या सिंचनाच्या पाण्यात गतिरोधक आहेत हे स्प‌ष्टच आहे. 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
असे करा घाटेअळीचे जैविक व्यवस्थापनघाटेअळी नियंत्रणासाठी सातत्याने रासायनिक...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...