सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांना निधी देणार : जलसंपदामंत्री पाटील

 Irrigation Scheme to be funded in Sangli district: Water Resources Minister Patil
Irrigation Scheme to be funded in Sangli district: Water Resources Minister Patil

सांगली : ‘‘जिल्ह्यातील सिंचन योजनांची कामे चालू वर्षी पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनेच्या कामांच्या पूर्णत्वासाठी निधी देण्यात येईल,’’ असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले. ‘‘जिल्ह्यातील काही गावे सिंचन योजनेच्या पाण्यापासून वंचित आहेत. त्यांनाही पाणी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल,’’ असेही त्यांनी सांगितले. 

पाटबंधारे कार्यालयात तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील ताकारी, म्हैसाळ योजनेच्या कामाबाबत शुक्रवारी(ता. ७)  बैठक झाली. त्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. आमदार सुमन पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले, सुरेश पाटील, अविनाश पाटील, संजय पाटील, सतीश पवार, अर्जुन पाटील, दत्ताजीराव पाटील, भानुदास पाटील, सागर पाटील, कार्यकारी अभियंता एस. एम. नलवडे आदी उपस्थित होते. 

तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्‍यातील काही गावांना असता पाणी मिळत नसल्याची बाब पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. याबाबत तत्काळ मार्ग काढण्याच्या सूचना पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

मंत्री पाटील म्हणाले, ‘‘टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांची कामे सध्या सुरू आहेत. या कामांना सन २०२० ची मुदत असल्याने ती पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर गतीने प्रयत्न सुरू आहेत. केवळ जिल्ह्यातील योजना नव्हे, तर महाराष्ट्रातील सिंचन योजनांची कामे पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. पाणी योजना पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध केला जात आहे. त्यामुळे कोणत्याही योजनांची कामे अपूर्णावस्थेत थांबणार नाहीत, याबाबतची दक्षता घेण्यात आली आहे.’’ 

‘‘तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील काही गावांत ताकारी व म्हैसाळ योजनेचे पाणी गेलेले नाही. तासगावातील सहा गावांचा समावेश आहे. त्यासाठी आमदार सुमन पाटील यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी वंचित गावांना पाणी देण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील वंचित गावांना लवकरच पाणी उपलब्ध करून दिले जाईल,’’ असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com