राज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे.
ताज्या घडामोडी
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावट
अमरावती ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाने पुरती दाणादाण उडवून दिली. या माध्यमातून पावसाने सरासरी पार केली असली तरी भूजल पातळीत मात्र १ ते १० फुटापर्यंत घट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उशिरा आलेला पाऊस, अमर्याद उपसा आणि जलपुर्नभरणाचा अभाव या कारणांमुळे हे घडल्याची शक्यता आहे.
अमरावती ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाने पुरती दाणादाण उडवून दिली. या माध्यमातून पावसाने सरासरी पार केली असली तरी भूजल पातळीत मात्र १ ते १० फुटापर्यंत घट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उशिरा आलेला पाऊस, अमर्याद उपसा आणि जलपुर्नभरणाचा अभाव या कारणांमुळे हे घडल्याची शक्यता आहे.
मॉन्सूनच्या आगमनानंतर या वेळी दमदार पावसाची अपेक्षा वर्तविली जात होती. परंतु, जून महिन्यात केवळ सात दिवस, जुलै महिन्यात १४ दिवस अशा पावसाची नोंद झाली. पावसाच्या सुरुवातीच्या ६० दिवसांत केवळ २१ दिवसच पावसाची नोंद झाली. दुबार पेरणीसह पीक जगविण्यासाठी या काळात भूजलाचा अमर्यादित उपसा झाला. त्याचा थेट परिणाम भूजल पातळीवर झाल्याचे सांगितले जाते. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून पुन्हा पावसाने कमबॅक केले. ऑगस्टमध्ये १२ दिवस तर सप्टेंबर महिन्यात पावसाचे १६ दिवस होते.
सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या ११४ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची सरासरी १०९.२ झाली. फक्त आठच तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली आहे. पावसाळा संपताच भूजल सर्वेक्षण यंत्रणेव्व्दरा जिल्ह्यातील नियमित निरीक्षणाच्या १५० व नव्याने स्थापित केलेल्या ९७९ अशा एकूण ११२९ विहिरींच्या पाणी पातळींच्या नोंदी घेण्यात आल्या. त्याआधारे तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार ४५६ गावांत भूजलात तूट आढळली आहे.
धामणगाव रेल्वे तालुका वगळता अन्य १३ तालुक्यांतील ४५६ गावांमधील भूजलात १ ते १० फुटांपर्यंत घट झाल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळेच सरासरीपेक्षा तीस टक्के कमी पाऊस झालेल्या भातकूली तालुक्याला यावर्षी पाणीटंचाईच्या झळा बसणार असल्याचे संकेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भातकुली तालुक्यातील ३९ गावे अलर्टवर आहेत. अहवालात ही तशी नोंद असून शासनाला हा अहवाल पाठविण्यात आला आहे. चांदूरबाजार तालुक्यात सरासरीच्या १५५ टक्के पावसाची नोंद झाली. परंतु, या तालुक्यात पाण्याचा उपसा अधिक झाला. त्यामुळेच या तालुक्यातील १५२ गावांमध्ये भूजलात १ मीटरपेक्षा अधिकची तूट आली आहे.
पावसाच्या सरासरीत माघारलेले तालुके आकडेवारी (टक्क्यांत) ः भातकुली ७०, अमरावती ९७, नांदगाव खंडेश्वर ९६.९, तिवसा ९०.६, वरुड ८७.
- 1 of 579
- ››