तुकाई उपसा सिंचन योजनेस अंतिम मंजुरी

तुकाई उपसा सिंचन योजनेस अंतिम मंजुरी
तुकाई उपसा सिंचन योजनेस अंतिम मंजुरी

मुंबई : नगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा सिंचन योजनेसही मंत्रिमंडळाने अंतिम मंजुरी दिली आहे. अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील या उपसा सिंचन योजनेमुळे या भागातील पाण्याची टंचाई कमी होणार असल्याने कर्जत तालुक्यात सिंचन निर्मिती होणार आहे. या योजनेसाठी ६१ कोटी ३ लाखांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सुधारित मान्यता प्रस्तावात तुकाई योजनेसाठी (बिटकेवाडीसह) ११५ दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण करण्यात आलेले आहे. या योजनेमुळे बिटकेवाडी, खुरंगेवाडी, वालवड, सुपा, बहिरोबावाडी, चांदे खुर्द, चांदे बुद्रुक, मुळेवाडी, दगडवाडी, चिंचोली, गुरव पिंप्री, टाकळी खांडेश्वरी, थिटेवाडी, डिकसळ, गोंदर्डी, रेहेकुरी ही गावे आणि वाड्या-वस्त्यांवरील शेती पाण्याखाली येणार आहे. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचीही सोय होणार आहे. या योजनेसाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीही आताच ५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यामधील अवर्षणप्रवण क्षेत्रातील ३ लघु पाटबंधारे तलाव व २० पाझर तलावासाठी कुकडी प्रकल्पांतर्गत कुकडी डावा तीर कालव्यामधून पाणी उपसा करून भरून देण्याचे व त्यानंतर या पाण्याचा सिंचनासाठी, पिण्यासाठी उपयोग करण्याचे नियोजन आहे. उपसा सिंचन योजनेसाठी सौरऊर्जाद्वारे वीजनिर्मिती करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अंदाजपत्रकात आवश्यक असलेल्या विजेची गरज भागविण्यासाठी सौरऊर्जेची तरतूद करण्यात आलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com