Agriculture news in marathi irrigation water supply bill pending over 50 crores in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यात सिंचनाची ५० कोटींवर पाणीपट्टी थकीत

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 जानेवारी 2020

परभणी : जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांची एकूण ५० कोटी ७३ लाख ८२ हजार रुपये एवढी सिंचन पाणीपट्टी थकीत आहे. त्यात एकट्या जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या ४४ कोटी ३७ लाख रुपये पाणीपट्टीचा समावेश आहे. पाणीपट्टीची वसुली होत नसल्याने कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी : जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांची एकूण ५० कोटी ७३ लाख ८२ हजार रुपये एवढी सिंचन पाणीपट्टी थकीत आहे. त्यात एकट्या जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या ४४ कोटी ३७ लाख रुपये पाणीपट्टीचा समावेश आहे. पाणीपट्टीची वसुली होत नसल्याने कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोनच्या कार्यकारी अभियंता कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील लघू प्रकल्पांचे लाभक्षेत्र ८ हजार ५४६ हेक्टर, मध्यम प्रकल्पाचे लाभक्षेत्र ४ हजार ७३२ हेक्टर, जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचे एकूण लाभक्षेत्र ९७ हजार ४०० हेक्टर आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे सर्वाधिक लाभक्षेत्र परभणी जिल्ह्यात आहे.

प्रकल्पाद्वारे ९० च्या दशकात सिंचनास सुरुवात झाली. परंतु, या धरणात पुरेसा पाणीसाठा नसलेल्या वर्षी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. सिंचनास सुरुवात झाली तेव्हापासून पाणीपट्टी थकीत आहे.

वसुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे पाणीपट्टीच्या थकबाकीत दरवर्षी भर पडत आहे. सध्या जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांकडे ४४ कोटी ३७ लाख ३ हजार रुपये एवढी पाणी पट्टी थकीत आहे. जिल्ह्यात करपरा (ता. जिंतूर) आणि मासोळी (ता. गंगाखेड) हे दोन मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या लाभधारक शेतकऱ्यांकडे २००४-०५ पासून ४ कोटी ९१ लाख रुपये पाणीपट्टीची थकबाकी आहे. जिल्ह्यात २२ लघू प्रकल्प असून, सिंचनाची १ कोटी ४५ लाख ६७ हजार रुपये पाणीपट्टी थकीत आहे.

अपुऱ्या मनुष्यबळामुळे वसुलीत अडचणी

सर्व प्रकल्पाची मिळून २०१६-१७ मध्ये २९ लाख रुपये, २०१७-१८ मध्ये ७० लाख रुपये, २०१९-२० मध्ये २० लाख ७० हजार रुपये पाणीपट्टी वसूल झाली. यंदा मोठ्या प्रकल्पाची ६९ हजार रुपये, मध्यम प्रकल्पाची १ लाख ४४ हजार रुपये, लघू प्रकल्पांची २८ हजार रुपये पाणीपट्टी वसूल झाली. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पाणीपट्टी वसुलीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे कालव्यांतर्गतच्या वितरण प्रणालीची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही, असे संबंधित सूत्रांनी सांगितले.

प्रकल्पनिहाय पाणीपट्टी थकबाकी (कोटींत)

प्रकल्प थकबाकी
जायकवाडी  ४४.३७०३
मध्यम ४.९११२
लघू  १.४५६७

 


इतर ताज्या घडामोडी
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...