agriculture news in Marathi irrigation well scheme stopped due to scarcity of funds Maharashtra | Page 2 ||| Agrowon

निधीअभावी सिंचन विहीर योजनेला खीळ 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 जुलै 2021

विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १३ हजार सिंचन विहिरी देण्याच्या कार्यक्रमाची घोषणा तत्कालीन भाजप सरकारच्या काळात करण्यात आली होती. 

नागपूर : विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १३ हजार सिंचन विहिरी देण्याच्या कार्यक्रमाची घोषणा तत्कालीन भाजप सरकारच्या काळात करण्यात आली होती. मात्र त्याकरिता निधीची तरतूद करण्यात आली नसल्याने ही योजना रखडली आहे. विभागात सुमारे २३७३ विहिरींचे काम या योजनेत सुरू करण्यात आले होते. त्यापैकी केवळ ५३२ विहिरींचेच काम पूर्ण होऊ शकले. 

पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या सहा जिल्ह्यांत संरक्षित सिंचन पर्याय उपलब्धतेला प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन भाजप सरकारने पुढाकार घेतला होता. त्याअंतर्गत १३ हजार सिंचन विहिरींची घोषणा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात दहा हजार सिंचन विहिरी बांधायच्या होत्या. २३७३ विहिरींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यांच्या बांधकामाला देखील सुरुवात झाली. मात्र विहिरींच्या बांधकामासाठी लागणारा २२९ कोटी ६४ लाख पाच हजार रुपयांचा निधी शासनस्तरावरून न मिळाल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून हे काम रखडले आहे. 

सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी ५३२ विहिरींचे काम पूर्ण केले. आतापर्यंत या योजनेसाठी फक्त २३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तो खर्चदेखील झाला. या योजनेत लाभार्थ्यांनी स्वखर्चाने अगोदर विहिरीचे काम करायचे आहे. त्या कामाचे मूल्यांकन करून गटविकास अधिकारी यांच्यामार्फत देयके काढली जातात. सद्यःस्थितीत १९०१ लाभार्थ्यांचे २० कोटी ७७ लाख रुपये शासनाकडून येणे आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी विहिरीच्या कामाकरिता उसनवारी करून पैसे घेतले. त्या पैशातून विहिरीचे बांधकाम केले. परंतु शासनाकडून निधी मिळण्यास अडचणी येत असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. 

अपूर्ण विहिरींसाठी हवा १८ कोटींचा निधी 
ज्या विहिरींची कामे सुरू झाली ती पूर्ण करणे आवश्यक आहे. अपूर्ण असलेल्या कामावर झालेला खर्च वाया जाऊ नये अशा १४५४ विहिरींसाठी १८ कोटी १९ लाख रुपयांची गरज आहे. पुढील हंगामात सुरू करायच्या नवीन विहिरींची संख्या सात हजार ६२७ आहे. त्या विहिरींसाठी १९० कोटी ६८ लाख रुपयांची गरज आहे. नवीन विहिरींकरीता निधी उपलब्ध झाल्याशिवाय कामे सुरू करू नये, असे सर्व जिल्ह्यांतील प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. 


इतर अॅग्रो विशेष
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...