Agriculture news in marathi; For irrigation wells If you have problems, complain: Jaiswal | Agrowon

सिंचन विहिरींसाठी त्रास झाल्यास करा तक्रार ः जयस्वाल
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

यवतमाळ  ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील विहिरींसाठी अधिकारी, कर्मचारी त्रास देत असल्यास शेतकऱ्यांनी थेट तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्‍याम जयस्वाल यांनी केले.

यवतमाळ  ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील विहिरींसाठी अधिकारी, कर्मचारी त्रास देत असल्यास शेतकऱ्यांनी थेट तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्‍याम जयस्वाल यांनी केले.

जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत ते बोलत होते. या सभेत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.  प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून २०१८-१९ या वर्षात ३९७ विहिरींचे उद्दिष्ट होते. त्यांपैकी २१३ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. याकरिता २७ कोटी १८ लाख रुपये खर्च झाले. उर्वरित विहिरींचे कामे जलदगतीने करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी  विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे लाभार्थींना विचारात घेऊन विहिरींचे कामे करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. 

वीज वितरणाकडून डिमांड दिल्या जात नसल्याच्या तक्रारी काही कृषी अधिकाऱ्यांनी सभेत केल्या. विशेष म्हणजे याबाबत वीज वितरण कंपनीला याबाबत पत्र सुद्धा देण्यात आले, परंतु वीज वितरणकडून कुठल्याही स्वरूपाचे पावले उचलली नसल्याची माहिती सभेत दिली गेली. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील २०१७-१८ मधील विहिरी पूर्ण झाल्या नाहीत. त्या योजनेचे सुद्धा पैसे शिल्लक आहेत. सर्वाधिक विहिरी नेर, दारव्हा तालुक्‍यात असल्याची माहिती समोर आली असून, उमरखेड तालुक्‍याने देखील यात आघाडी घेतली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे पुरवठा करण्यात आला. या योजनेचा काही निधी शिल्लक आहे. याचा उपयोग करून रब्बी हंगामात बियाणे पुरवठा शक्‍य आहे का? यावरही बैठकीत चर्चा झाली. या वेळी कृषी विकास अधिकारी पंकज बरडे उपस्थित होते.

भरपाईचा ठराव मंजूर
काढणीच्यावेळी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशा ठराव कृषी समितीच्या सभेत मांडण्यात आला. त्याला मंजुरी देण्यात आली.

इतर ताज्या घडामोडी
‘वसाका’ला उसाचे टिपरू तोडू देणार नाही,...नाशिक : ‘‘नाशिक जिल्ह्यातील कादवा व द्वारकाधीश या...
शेतकऱ्यांना संपूर्ण वीजबिलमाफी द्या, '...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
खेडीभोकरीला बोटीतून होतोय जीवघेणा...जळगाव : खेडीभोकरी (ता. चोपडा) ते भोकर (ता....
मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या...मुंबई  :  मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना...
रत्नागिरीत २० हजार टन भात खरेदीचे...रत्नागिरी  : यंदा जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा...सांगली  ः राज्यातील ऊस उत्पादकांना प्रतिटन...
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अकोल्यात `...अकोला  ः जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांना...
...त्याने आपल्या शेतातील भाजी दिली थेट...पुणे : शिरूर तालुक्यातील केंदूर येथील सुनील...
रत्नागिरी जिल्ह्यात पिकांचे नुकसान आठ...रत्नागिरी : क्यार आणि महाचक्रीवादळामुळे जिल्ह्यात...
जळगाव : सोयाबीनची खरेदी शून्य; ज्वारी...जळगाव : जिल्ह्यात सोयाबीनची शासकीय केंद्रातील...
नांदेड विभागात यंदा गाळपासाठी १६ साखर...नांदेड : यंदाच्या २०१९-२० च्या गाळप हंगामात...
सिद्धेश्वर धरणामध्ये ९२.५० टक्के...गोजेगाव, जि. हिंगोली : पूर्णा नदीवरील औंढा नागनाथ...
केंद्राचे पथक आज अकोला जिल्ह्यातअकोला : पावसामुळे शेतीचे व पिकांचे नुकसान झालेले...
नगर जिल्ह्यात गव्हात बियाणे बदलाचे...नगर : रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांत...
किमान तापमानात घट; विदर्भात थंडीत वाढमहाराष्ट्रावरील हवेचा दाब वाढत आहे. या आठवडाच्या...
परभणीत वाटाण्याला ४००० ते ६००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
पोटदुखीवर नाडुकली उपयुक्त स्थानिक नाव     ः  ...
लोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली...शेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...