ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर  रोपनिर्मितीची पंतप्रधानांकडून दखल 

सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍युकल्चरकडून शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रम, रोपनिर्मिती कार्याची थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली.
Ishveda Samugachaya Tissueculture Ropenirdichi Pantpradhankadoon interference
Ishveda Samugachaya Tissueculture Ropenirdichi Pantpradhankadoon interference

अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍युकल्चरकडून शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रम, रोपनिर्मिती कार्याची थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत नुकत्याच झालेल्या ऑनलाइन कॉन्फरन्समध्ये मोदी यांनी ईश्‍वेद बायोटेक व शेतकरी उत्पादक कंपनीची प्रशंसा केली. कार्यक्रमामध्ये पंतप्रधानासमोर ईश्‍वेदच्या टिश्युकल्चर (उतिसंवर्धित) केळीची रोपे, त्यांच्या उत्पादनाविषयी उत्तर प्रदेशातील शेतकरी उत्पादक कंपनीने सादरीकरण केले होते.  सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेककडून टिश्‍युकल्चर केळी रोपांची निर्मिती करून देशांमधील विविध राज्यांतील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जातात. ईश्‍वेदच्या केळी रोपांना उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी मोठी पसंती दर्शवलेली आहे. उत्तर प्रदेशात जेथे केळीचे उत्पादन अधिक घेतले जाते अशा भागातील शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींसोबत मोदी यांनी संवाद साधला.  या वेळी उत्तर प्रदेशातील केळी उत्पादक कंपनीच्या सदस्यांनी केळीची रोपे ईश्‍वेद बायोटेकडून घेतल्याचे सांगितले. तसेच या रोपांमुळे उत्पादनात किती व कशी वाढ झाली याची माहिती पंतप्रधानांना दिली. याचे त्यांनी मोठे कौतुक केले. कंपनीच्या कार्याबाबत गौरवोद्‍गार काढले. ईश्‍वेद बायोटेककडून केळीसोबत बांबू, जांभूळ, लिंबू, मोसंबी, संत्रा, सीताफळ, किवी, चिंच, आंबा व भाजीपालावर्गीय रोपांची निर्मिती केली जाते. याचा उपयोग देशभरातील शेतकरी करीत असतात. 

प्रतिक्रिया 

देशाच्या पंतप्रधानांनी ईश्‍वेदच्या केळीची टिश्‍युकल्चर रोपे व उत्पादनाविषयी केलेली प्रशंसा प्रेरणा देणारी आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आम्ही सुरू केलेल्या प्रयत्नांना यामुळे आणखी बळकटी मिळेल. दृढ निश्‍चयाने आम्ही ध्येयासाठी कटीबद्ध राहू.  - संजय वायाळ, व्यवस्थापकीय संचालक, ईश्‍वेद समूह, सिंदखेडराजा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com