अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने झाले ‘आयएसओ’
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने झाले ‘आयएसओ’

अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने झाले ‘आयएसओ’

अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. घुसर, बोरगावमंजू, भौरद, निंभोरा व कापशी येथील हे दवाखाने आहेत. हे पाचही दवाखाने अकोला पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील आहेत.   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील २८ पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ करण्यासाठी प्रक्रिया राबविली जात आहे. यांपैकी पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या पाच पशुवैद्यकीय केंद्रांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. अकोला जिल्ह्यात पहिल्यांदाच पशुवैद्यक केंद्र हे आयएसओ झाले आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ६८ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या दवाखान्यांमध्ये जनावरांसाठी अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपचार मिळावेत, त्या दृष्टीने सर्व सोयी करण्याचा प्रयत्न केला जात आहेत. आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषद पशुवैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. आर. मिश्रा यांनी पहिल्या टप्प्यात २८ पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ करण्याचा निर्धार केला. त्यांपैकी अकोला पंचायत समितीमधील पाच दवाखान्यांना हे मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे. राहिलेल्या उर्वरित दवाखान्यांना लवकरच हे मानांकन प्राप्त होईल, असा दावा केला जात आहे. अकोला पंचायत समितीअंतर्गत असलेल्या घुसर, बोरगावमंजू, भौरद, निंभोरा, कापशी या ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यांनी आयएसओ मानांकन प्राप्त केल्याने तेथील सोयीसुविधांचा दर्जा वाढेल, असेही सांगितले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com