Agriculture news in marathi; ISO vets five veterinary hospitals in Akola district | Agrowon

अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने झाले ‘आयएसओ’

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. घुसर, बोरगावमंजू, भौरद, निंभोरा व कापशी येथील हे दवाखाने आहेत. हे पाचही दवाखाने अकोला पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील आहेत.  

अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. घुसर, बोरगावमंजू, भौरद, निंभोरा व कापशी येथील हे दवाखाने आहेत. हे पाचही दवाखाने अकोला पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील आहेत.  

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील २८ पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ करण्यासाठी प्रक्रिया राबविली जात आहे. यांपैकी पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या पाच पशुवैद्यकीय केंद्रांना आयएसओ मानांकन मिळाले आहे.
अकोला जिल्ह्यात पहिल्यांदाच पशुवैद्यक केंद्र हे आयएसओ झाले आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ६८ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत.

या दवाखान्यांमध्ये जनावरांसाठी अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपचार मिळावेत, त्या दृष्टीने सर्व सोयी करण्याचा प्रयत्न केला जात आहेत. आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषद पशुवैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. आर. मिश्रा यांनी पहिल्या टप्प्यात २८ पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ करण्याचा निर्धार केला. त्यांपैकी अकोला पंचायत समितीमधील पाच दवाखान्यांना हे मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे. राहिलेल्या उर्वरित दवाखान्यांना लवकरच हे मानांकन प्राप्त होईल, असा दावा केला जात आहे.

अकोला पंचायत समितीअंतर्गत असलेल्या घुसर, बोरगावमंजू, भौरद, निंभोरा, कापशी या ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यांनी आयएसओ मानांकन प्राप्त केल्याने तेथील सोयीसुविधांचा दर्जा वाढेल, असेही सांगितले जाते.


इतर बातम्या
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
आगामी हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे राखून...अकोला  : सोयाबीन पिकाखालील पेरणी...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
कलाग्रामच्या माध्यमातून बचत गटांसाठी...नाशिक : दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिकमध्ये...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...