बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (कनेक्शन कट) कारवाई करण्याचा इशारा महावितरणने राज्
ताज्या घडामोडी
वीजबिलांचा विषय मंत्रिमंडळाने सोडलेला नाहीः उद्धव ठाकरे
जे अंगावर येतील त्यांच्या हात धुवून मागे लागेन, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
मुंबई : जे अंगावर येतील त्यांच्या हात धुवून मागे लागेन, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. यावेळी वाढीव वीज बिलांचा प्रश्न राज्य मंत्रिमंडळाने सोडलेला नाही. काय करता येऊ शकते. काय करायला पाहिजे, या गोष्टींवर आमचा विचार सुरु असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुळामध्ये ‘वाढीव’ हा जो शब्द आहे तो वाढीव आहे का? हा विषय मंत्रिमंडळात पण चर्चिला जात आहे. खरंच मीटरमुळे काही बिले वाढलीयेत का? का दोन-तीन महिन्यांची बिले एकदम आली आहेत? त्यामुळे ती वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी जिथे जिथे तक्रारी आल्या, तिथे तिथे या वीज मंडळातील लोकं जाऊन मीटर चेक करून आली आणि ती चेक केल्यानंतर बहुतेकांच्या शंकेचं निरसन झालेले आहे. तरीदेखील अजूनही तो विषय मी काही सोडलेला नाही. मंत्रिमंडळाने सोडलेला नाही. काय करता येऊ शकते, काय करायला पाहिजे या गोष्टींवर आमचा विचार सुरू आहे.
विरोधकांनी आरशात पाहावे
जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे भाव आज काय आहेत हो? आजसुद्धा साधारणतः प्रति लिटर २० रुपयांच्या आसपास आहेत आणि आपल्याकडे पेट्रोल ८८ रुपये आहे, का नाही कमी करत? का नाही तुम्ही त्याच्यावर आंदोलन करत? गॅसचे भावही वाढले होते, त्याचवेळी गॅसची सबसिडीही काढली. पण क्रूड तेलाचे भाव कमी झाल्यानंतरसुद्धा आपल्या देशात पेट्रोल, डिझेलचे भाव हे का चढे आहेत? बाकी जागतिक अर्थव्यवस्था वगैरे यावर मला बोलायचे नाही. पण २०१४ च्या आधी तुमचा एक तो मुद्दा होता की, डॉलर किती चढले. तेव्हा मला वाटते ५९ रुपये होता. आता किती झालाय डॉलरचा भाव? काय व्यवस्था तुम्ही केली? आमच्या अंगावर येण्याआधी निदान बाहेर पडताना आरशात तुमचं तोंड तर बघा, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली.