पुणे जिल्ह्यातील प्रकल्पांचे प्रश्‍न १५ जानेवारीपर्यंत सोडवा ः अजित पवार

Issue of projects solve in the district by January 15 : Ajit Pawar
Issue of projects solve in the district by January 15 : Ajit Pawar

पुणे ः ‘‘पुणे जिल्ह्यातील रेंगाळलेले जायका प्रकल्प, मुंढवा जॅकवेल प्रकल्प, भामा आसखेड पाणी पुरवठा आणि खडकवासला ते फुरसुंगी बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रकल्पाचे प्रश्न येत्या १५ जानेवारी पर्यंत सोडवावे’’, अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीची बैठक तसेच विविध कालव्यातील पाण्याबाबतच्या नियोजनाचा आढावा शासकीय विश्रामगृहात येथे शनिवारी (ता. २८) घेण्यात आला. 

या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खासदार गिरीश बापट, अमर साबळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके, अशोक पवार, आमदार अनंत गाडगीळ, आमदार मुक्ता टिळक, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे अतिरिक्‍त आयुक्त शांतनू गोयल, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्यासह कालवे सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले की, ‘‘यंदा डिसेबर संपत आला असताना जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा चांगला आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना रब्बीसह, उन्हाळा आणि पावसाळा सुरू होईपर्यतचे पाणी कसे पुरेल? शहर आणि जिल्ह्याला कसे पुरेसे पाणी मिळेल? यांचे नियोजन अधिकाऱ्यांनी करावे. 

टेमघरचे काम केल्यामुळे काही टक्के गळती थांबली आहे. मात्र, राहिलेले काम जून सुरू होण्याआधी पूर्ण करावे. पुणे पालिकेला साडे अकरा टीएमसीचा कोटा मंजूर झालेला आहे. परंतु, पालिका कधीकधी १५ ते १८ टीएमसी पाणी उचलते. वाढत्या शहरीकरणामुळे पाण्याची गरज वाढत आहे. पाण्याचा कोटा राज्य स्तरावर ठरलेला आहे. या आधीच्या पाणी वापरामध्ये जिल्ह्यातील काही शेतकरी न्यायालयात गेले आहे. त्यामुळे भविष्यात या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी जायका प्रकल्पाला गती, शहरातील तलाव, जुन्या विहिरी अशा स्त्रोतांचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठी करण्याचे पर्याय प्रत्यक्षात आणावे लागणार आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com