Agriculture news in marathi It is better to lock down the hungry stomach ...! | Agrowon

उपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय...! 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 एप्रिल 2021

कोरोनाच लय भ्या वाटतंय... आमाचा जीव काय वर आलाय व्हयं... पण काय करणार उपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय...! राज्यात संचारबंदी लागू झाली असतानाही कोरोनाच्या सावटाखाली मोल - मजुरीला जाणाऱ्या महिलांनी आपली व्यथा ‘सकाळ’शी संवाद साधताना व्यक्त केली. 

रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर : कोरोनाच लय भ्या वाटतंय... आमाचा जीव काय वर आलाय व्हयं... पण काय करणार उपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय...! राज्यात संचारबंदी लागू झाली असतानाही कोरोनाच्या सावटाखाली मोल - मजुरीला जाणाऱ्या महिलांनी आपली व्यथा ‘सकाळ’शी संवाद साधताना व्यक्त केली. 

कोरोनाची दुसरी लाट जोरात आल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी जाहीर केली. घरात बसून राहणाऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून गरजूंना अन्न - धान्य देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज असते. घरातील लोकांचे आजारपण असो वा खानपान असो दररोज पैशांची गरज भासत असते. म्हणून हातावरचे पोट असलेल्या लोकांना मजुरी करण्याशिवाय पर्याय नाही. रोपळे व परिसरात मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. विशेषतः माहिलांना अजूनही मोलमजुरी करावीच लागत आहे. सध्या राज्यात कडक संचारबंदी लागू झाली आहे. 

आज संचारबंदीतही अनेक महिला मोल मजुरीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला तेव्हा आशाबाई खरे म्हणाल्या, की आमचं हातावरचं पोट हाय. घरात बसून आमची चूल पेटणार न्हाय. म्हणून मोलमजुरीला जावच लागत असल्याचे सांगितले. निर्मला खरे यांनी तर कोरोनात कामाला न्हाय गेलो तर घर खर्च कसा भागवायचा? असाच प्रतिप्रश्‍न केला. सुकमरा खरे यांनी कोरोनासाठी आम्ही तोंडाला रुमाल बांधून स्वतःची काळजी घेत असल्याचे सांगितले. 

सरकारने कोरोनाच्या काळात आमच्या सारख्या मोलमजुरी करणाऱ्या लोकांसाठी महिन्याला तीन हजार रुपयांची मदत द्यावी. 
- आशाबाई खरे, महिला मजूर, रोपळे बुद्रुक, ता. पंढरपूर 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...
भुईमूग खर्चालाही महागअकोला ः उन्हाळी हंगामात यंदा लागवड केलेल्या...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
जोरदार पावसाची शक्यता पुणे : मराठवाडा ते मध्य प्रदेशचा मध्य भाग या...
बाजार समित्याबंदमुळे खरीप नियोजन ‘...पुणे: कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन...
शेततळे अनुदानाचे वीस कोटी वितरित नगर ः राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल...
साखर कारखान्यांकडून ९२ टक्के ‘एफआरपी’...कोल्हापूर : राज्यात एप्रिलअखेर एकूण रकमेच्या ९२...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत पुणे : राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
मॉन्सून यंदा वेळेवर पुणे : सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक...
शेतकऱ्यांकडे २९ लाख क्विंटल घरचे बियाणे पुणे ः कृषी विभागाने ग्रामबिजोत्पादन मोहिमेतून...
मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत...
पावसाचा प्रभाव वाढणार पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची...