agriculture news in marathi It is impossible to rent Chosaka without sugarcane cultivation | Agrowon

ऊस लागवडीशिवाय चोसाका भाड्याने देणे अशक्य

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

चोपडा, जि.जळगाव :तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्त उतारा असलेल्या उसाची लागवड करावी. ऊस लागवडीशिवाय चोसाका भाडेतत्त्वावर देणे अशक्य आहे.

चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी उसलागवडीची गरज आहे. कार्यक्षेत्रात ऊस असेल, तर निश्चितच भाडेतत्त्वावर घेणारा सकारात्मक विचार करेल? जर परिसरात ऊसच नाही, तर कारखाना कसा चालेल? यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्त उतारा असलेल्या उसाची लागवड करावी. ऊस लागवडीशिवाय चोसाका भाडेतत्त्वावर देणे अशक्य आहे. 

बंद अवस्थेत असलेला चोसाका पुढील गळितात सुरू होण्याची चिन्हे आहेत. यासाठी तालुक्यातील शेतकरी, कामगार, ऊसतोड मजूरांना न्याय देऊन, त्यांचे सहकार्य असणे गरजेचे आहे. ‘चोसाका’ला भाडेतत्त्वावर देण्याबाबत बुलडाणा बँकेकडून हिरवा कंदील मिळाला आहे. याबाबत संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.

 तालुक्याचा मानबिंदू असलेला चोसाका सुरू व्हावा, ही प्रत्येकाची इच्छा आहे. कारखान्याच्या हितासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत बंद असलेल्या कारखान्याची चाके सहकार्य केल्यास सुरू होतील.

कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे. शेतकरीच मालक आहेत. यामुळे शेतकऱ्यांनीच यावर विचारमंथन करून ऊस लागवड करून ‘चोसाका’ला वाचवावे. शेतकऱ्यांनी चोसाका २०२१-२२ या गळीत हंगामासाठी ऊस लागवड धोरण निश्चित करून कारखान्याच्या गाळप क्षमतेला अनुसरून उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करावी.

 पूर्वानुभव वाईट 

तालुक्यातील शेतकरी एकीकडे रक्ताचे पाणी करून उसाचे पीक घेत आहेत. आपल्या जीवनात उसाने गोडी आणावी, यासाठी ते झटत आहेत. पण, शेतकऱ्यांना याचे वाईट अनुभव आले आहेत. पुन्हा तसे होणार नाही, याकडे लक्ष देऊन कारखाना पूर्ण क्षमतेने कसा चालेल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...