बुलडाणा जिल्ह्यात होणार नळ योजनांची दुरुस्ती

उन्हाचे चटके या भागात वाढले असून, पाणी समस्यासुद्धा बिकट बनत चालली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याची सोय करण्यासाठी प्रशासनाने तातडीच्या उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी ३० गावांत नळ योजनांची दुरुस्ती केली जाणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात होणार नळ योजनांची दुरुस्ती It will be held in Buldana district Repair of plumbing schemes
बुलडाणा जिल्ह्यात होणार नळ योजनांची दुरुस्ती It will be held in Buldana district Repair of plumbing schemes

बुलडाणा : उन्हाचे चटके या भागात वाढले असून, पाणी समस्यासुद्धा बिकट बनत चालली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याची सोय करण्यासाठी प्रशासनाने तातडीच्या उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी ३० गावांत नळ योजनांची दुरुस्ती केली जाणार आहे.

जि‍ल्हा परिषदेच्या वतीने सादर पाणीटंचाई कृतिआराखड्यात समाविष्ट असलेल्या सिंदखेडराजा, चिखली, बुलडाणा, देऊळगावराजा, लोणार व मेहकर तालुक्यातील काही गावांसाठी तात्पुरती पूरक नळयोजना व नळयोजनांची विशेष दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामध्ये चिखली तालुक्यातील देऊळगाव धनगर, कोनड खुर्द, धोत्रा नाईक, अमोना, रोहडा, गुंजाळा, अंचरवाडी, काटोडा, एकलारा, किन्ही नाईक, सावरगांव डुकरे, खैरव, भालगाव या गावांमध्ये पाणीटंचाई नि‍वारणार्थ नळयोजनेची विशेष दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सिंदखेड राजा तालुक्यातील पांगरखेड, दत्तापूर, लिंगा येथे नळयोजनांची विशेष दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे. 

लोणार तालुक्यातील धायफळ, जाफराबाद, पार्डा दराडे, टिटवी, देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावमही, गिरोली खुर्द, बोराखेडी बावरा, बुलडाणा तालुक्यातील गुम्मी, अंभोडा, तराडखेड, मेहकर तालुक्यातील खानापूर, घाटबोरी, दादुलगव्हाण व गणपूर गावांमध्ये नळयोजनांची विशेष दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे.

देऊळगावराजा तालुक्यातील सेवानगर, सिंदखेडराजा तालुक्यातील बुट्टा, चिखली तालुक्यातील पिंपरखेड, कारखेड, हराळखेड, गांगलगाव, मेहकर तालुक्यातील लोणी लव्हाळा, बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड गावामध्ये तात्पुरती पूरक नळयोजना मंजूर करण्यात आली आहे. मंजूर तात्पुरत्या पूरक नळयोजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर तात्पुरती पूरक नळ योजना किमान तीन वर्षांसाठी कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी, असे यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com