जळगाव जिल्ह्यात होणार ४० लाखांवर लशीकरण

जळगाव ः जिल्ह्यात कोविड लशीकरणास सुरू झाले आहे. सुरवातीस आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफला लशीकरण होईल.
 It will be held in Jalgaon district Vaccination on 40 lakhs
It will be held in Jalgaon district Vaccination on 40 lakhs

जळगाव ः  जिल्ह्यात कोविड लशीकरणास सुरू झाले  आहे. सुरवातीस आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफला लशीकरण होईल. नंतर महसूल, पोलिस क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे लशीकरण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जारी केली आहे. 

जिल्ह्यात सात केंद्रांवर लशीकरण सुरू राहील. त्यात जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शिवाजीनगरातील जैन रुग्णालय, चोपडा, जामनेर उपजिल्हा रुग्णालय, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा या तीन ग्रामीण रुग्णालयांत लशीकरण होईल. 

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात २४ हजार ३२० लसींचे डोस आले आहेत. वरील केंद्रांवर आठवड्यातून चार दिवस, दररोज शंभर जणांना लशीकरण होईल. लशीकरणापूर्वी संबंधितांची आरेाग्य तपासणी होईल. त्याची ओळख पटवून आधार कार्डाची तपासणी होईल. त्याची माहिती संगणकावर फीड करून नंतर संबंधितांना लशीकरण होईल. अर्धा तास लस दिलेल्यांना निरीक्षणाखाली ठेवले जाईल. 

जिल्ह्यात जसजशा लसी उपलब्ध होतील तसतशी लशीकरण केंद्रे वाढविली जाणार आहेत. किमान वर्षभर लशीकरण सुरू राहील. 

 मेसेज एक दिवस अगोदर संबंधितांना कळविला जाणार आहे. त्यात लशीकरण कोणत्या दिवशी, ठिकाणी, वेळी होणार आहे याची माहिती असते. लस दिल्यांनतर पुन्हा डोस केव्हा दिला जाईल त्याची तारीखही कळविली जाणार आहे. 

कंट्रोल रूमची निर्मिती 

कोविड लशीकरणावर नियंत्रणासाठी किंवा कोणाला लशीकरणानंतर साइड इफेक्ट झाल्यास त्यावर नियंत्रणासाठी जिल्हा रुग्णालयात कोविड लशीकरण नियंत्रण कक्ष सरू केला आहे. त्यांचा क्रमांक २२२६६११ असा आहे. स्तनदा माता, लशीकरणानंतर नाकातून रक्त बाहेर येणाऱ्या व्यक्ती, ज्यांची इम्युनिटी अधिक आहे. त्यांना लशीकरण केले जाणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com