सिंधुदुर्गमध्ये होणार ड्रोनद्वारे होणार भूमापन 

शासनाच्या स्वामित्व योजनेतर्गत जिल्ह्यातील ३२ गावठणांचे ड्रोनद्वारे भूमापन होणार आहे. या सर्व्हेक्षणानंतर तेथील रहिवाशांना मालमत्ता कार्ड देण्यात येणार आहे.
सिंधुदुर्गमध्ये होणार  ड्रोनद्वारे होणार भूमापन It will be held in Sindhudurg Surveying will be done by drone
सिंधुदुर्गमध्ये होणार  ड्रोनद्वारे होणार भूमापन It will be held in Sindhudurg Surveying will be done by drone

सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या स्वामित्व योजनेतर्गत जिल्ह्यातील ३२ गावठणांचे ड्रोनद्वारे भूमापन होणार आहे. या सर्व्हेक्षणानंतर तेथील रहिवाशांना मालमत्ता कार्ड देण्यात येणार आहे. भारतीय सर्व्हेक्षण विभाग, भूमिअभिलेख विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 

गावठाणांचे ड्रोनद्वारे भूमापन जिल्हास्तरीय नियत्रंण समितीची सभा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, भूमीलेख अधीक्षक डॉ. विजय वीर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, डॉ. सौरभ तुपकर, प्रियदा साकेारे आदी उपस्थित होते. 

शासनाच्या स्वामित्व योजनेतर्गंत जिल्ह्यातील ३२ गावठणांची ड्रोनद्वारे भूमापन करण्यात येणार आहे. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी गावस्तरावर मंडळ अधिकारी, तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सनियत्रंण समिती गठित करण्यात आली आहे. 

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा सनियत्रंण समिती सभेत जिल्ह्यातील पाट, अणाव (ता. कुडाळ) चौकुळ, मासुरे, नेने, गाळे, केगद, फणसवडे, कलंबिस्त,(ता. सावंतवाडी) मोर्ले, घोटगेवाडी, वझरे (ता. दोडामार्ग) पियाळी, माईण, नागवे, लोरे, करंजे, दिगवळे, हुमरठ (ता. कणकवली)टेंबवली, लिंगडाळ, वरेरी, तोरसोळे, किंजवडे, धालवली, (ता.देवगड) त्रिबंक, सडेवाडी, पिरावाडी, कट्टा, बगाडवाडी, धामापूर, अपराधवाडी, (ता. मालवण) या गावठणांचे ड्रोनद्वारे भूमापन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 

हे होतील फायदे  सध्या गावठाणात राहणाऱ्या रहिवाशांकडे मालमत्ताबाबत कोणतेच कागदपत्रे नाहीत. या प्रक्रियेमुळे शासनाच्या मिळकतीचा नकाशा तयार होईल. रहिवाशांच्या मालकी हक्काचे अभिलेख व मिळकत पत्रिका तयार होणार आहेत. ग्रामपंचायतींना गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निमूर्लन होणार आहे. या शिवाय मालमत्तांचे जीआयएस आधारित रेखांकन, मूल्यांकन, गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार करणे, गावठाणातील खुल्या जागेचा रस्त्याचा नकाशा करणे, गावठाणातील प्रत्येक घर, खुली जागा, रस्ता, गल्ली, नाला यांना भूमापन क्रमांक या सर्व्हेक्षणामुळे मिळणार आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com