प्रत्येक गावाचा होणार कृषी विस्तार आराखडा 

या वर्षी पासून पहिल्यांदाच ग्राम स्तरावर कृषी विकास समितीची स्थापना करून ग्राम स्तरावर लोकप्रतिनिधी, शेतकरी याचा समावेश करून कृषी आराखडे तयार करण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.
प्रत्येक गावाचा होणार  कृषी विस्तार आराखडा It will happen to every village Agricultural Extension Plan
प्रत्येक गावाचा होणार  कृषी विस्तार आराखडा It will happen to every village Agricultural Extension Plan

जालना : कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचे नियोजन दर वर्षी होतच असते सदरचे नियोजन हे राज्य किंवा जिल्हा स्तरावर केले जात होते. या वर्षी पासून पहिल्यांदाच ग्राम स्तरावर कृषी विकास समितीची स्थापना करून ग्राम स्तरावर लोकप्रतिनिधी, प्रगतिशील शेतकरी याचा समावेश करून कृषी आराखडे तयार करण्याचे काम सुरू असल्याचे आत्माचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले. 

खरीप हंगामाचा ग्राम कृषी आराखडा तयार करीत असताना पाण्याचा ताळेबंद विचारात घेऊन येत्या हंगामात पीक रचना व पीक पद्धतीमध्ये बदल करणे बाबत विचार विनिमय करून त्यानुसार नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात येणार आहे. विकेल ते पिकेल, या अभियानाचा उद्देश लक्षात घेऊन बाजारात मागणी असलेल्या व नवीन पिकांची लागवड क्षेत्र वाढ करून मूल्यासाखळी विकसित केली जाणार आहे. 

जालना जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर जमिनीचा सुपीकता निर्देशांक लावण्यात आला आहे. शेतकऱ्यांना फलक समजावून सांगून त्यानुसार खतांचा संतुलित वापरास प्रोत्साहन व किमान दहा टक्के रासायनिक खतांची करणे व शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, मागील खरीप हंगामातील गाव निहाय, पीक निहाय क्षेत्र उत्पादन उत्पादकता कृषी समितीच्या निदर्शनास आणून उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. गावाच्या गरजेनुसार प्रमुख पिकांच्या सरळ वाणाचे बीजोत्पादन केले जाणार आहे.

मूलस्थानी जलसंधारण करण्यासाठी जनजागृती करून रुंद सरी व वरंबा पद्धतीने सोयाबीन पेरणी करून घेणार गावाच्या गरजेनुसार कार्यशाळा आयोजित करून माती नमुना काढणे, बीजप्रक्रिया करणे, बियाणे उगवण क्षमता तपासणे इत्यादी मोहिमा राबविण्यात येणार आहेत. गावाच्या गरजेनुसार किमान एक कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करणे, मग्रांरोहयो फळबाग, शेततळे इत्यादी साठी लाभार्थी निवड, कमी पाण्यावर येणाऱ्या फळबागेसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. 

कृषी क्षेत्रातील नियोजनामध्ये गाव पातळीवरील शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यात प्रथमच ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये गाव पातळीवरील लोकप्रतिनिधी, गावातील प्रगतशील शेतकरी व कर्मचारी यांचा समावेश असल्यामुळे लोकप्रतिनिधी सरपंच, उपसरपंच व प्रगतिशील शेतकरी इतर पदाधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या गावाच्या विकास आराखडा बनवून कृषी क्षेत्रात विकास घडवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com