सातबारासह कागदपत्रे घेऊन तलाठी शेतकऱ्यांच्या दारी

पीककर्ज मिळवण्यासाठी महत्त्वाचा भाग असलेला सातबारा उतारा मिळवण्यासाठी अनेकांना तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. तलाठ्यांकडे एकापेक्षा अधिक ठिकाणचा प्रभार असल्याने तर मोठी अडचण होते.
सातबारासह कागदपत्रे घेऊन तलाठी शेतकऱ्यांच्या दारी Taking documents with Satbara Doors of Talathi farmers
सातबारासह कागदपत्रे घेऊन तलाठी शेतकऱ्यांच्या दारी Taking documents with Satbara Doors of Talathi farmers

पातुर्डा, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळवण्यासाठी महत्त्वाचा भाग असलेला सातबारा उतारा मिळवण्यासाठी अनेकांना तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. तलाठ्यांकडे एकापेक्षा अधिक ठिकाणचा प्रभार असल्याने तर मोठी अडचण होते. आठवड्यातील काही दिवसच तलाठी गावात भेटतात. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होते.

कोरोनाच्या काळात अशी कागदपत्रे गोळा करणे एक दिव्य बनलेले असते. मात्र, संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे कार्यरत असलेले तलाठी एस. एस. कुसळकर यांनी कागदपत्रे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘तलाठी शेतकऱ्याच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला. 

सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच पुढील हंगामासाठी शेतकरी पिककर्जाची तजवीज करण्याच्या हेतूने तयारीला लागला. अनेक ठिकाणी आतापासूनच सातबारा उतारा मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. कुठे ऑनलाइन लिंक नसल्याचेही प्रकार होत आहेत. अशा बिकट स्थितीत पातुर्डा  तलाठी कार्यालयाअंतर्गत आवार येथे कार्यरत असलेले तलाठी एस. एस. कुसळकर यांनी पुढाकार घेत तलाठी शेतकऱ्याच्या दारी हा उपक्रम सुरू केला.

पीककर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना सात-बारा, फेरफार, आठ ‘अ’ तसेच प्रतिज्ञापत्र आदी कागदपत्रांची आवश्यकता असल्याने कोद्री, टाकळी पंच, आस्वंद, आवार गावातील शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम हातात घेतला. यासाठी ग्रामसेवा सहकारी सोसायटीकडून शेतकऱ्यांची यादी गोळा करीत कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली. या गावांमधील बहुतांश शेतकरी पातुर्डा ग्राम सहकारी सोसायटी व जिल्हा केंद्रीय बँकेच्या पातुर्डा शाखेमार्फत पीककर्ज घेतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com