Agriculture news in marathi ITaking documents with Satbara Doors of Talathi farmers | Agrowon

सातबारासह कागदपत्रे घेऊन तलाठी शेतकऱ्यांच्या दारी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 एप्रिल 2021

पीककर्ज मिळवण्यासाठी महत्त्वाचा भाग असलेला सातबारा उतारा मिळवण्यासाठी अनेकांना तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. तलाठ्यांकडे एकापेक्षा अधिक ठिकाणचा प्रभार असल्याने तर मोठी अडचण होते. 

पातुर्डा, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळवण्यासाठी महत्त्वाचा भाग असलेला सातबारा उतारा मिळवण्यासाठी अनेकांना तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. तलाठ्यांकडे एकापेक्षा अधिक ठिकाणचा प्रभार असल्याने तर मोठी अडचण होते. आठवड्यातील काही दिवसच तलाठी गावात भेटतात. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होते.

कोरोनाच्या काळात अशी कागदपत्रे गोळा करणे एक दिव्य बनलेले असते. मात्र, संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे कार्यरत असलेले तलाठी एस. एस. कुसळकर यांनी कागदपत्रे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘तलाठी शेतकऱ्याच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला. 

सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच पुढील हंगामासाठी शेतकरी पिककर्जाची तजवीज करण्याच्या हेतूने तयारीला लागला. अनेक ठिकाणी आतापासूनच सातबारा उतारा मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. कुठे ऑनलाइन लिंक नसल्याचेही प्रकार होत आहेत. अशा बिकट स्थितीत पातुर्डा 
तलाठी कार्यालयाअंतर्गत आवार येथे कार्यरत असलेले तलाठी एस. एस. कुसळकर यांनी पुढाकार घेत तलाठी शेतकऱ्याच्या दारी हा उपक्रम सुरू केला.

पीककर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना सात-बारा, फेरफार, आठ ‘अ’ तसेच प्रतिज्ञापत्र आदी कागदपत्रांची आवश्यकता असल्याने कोद्री, टाकळी पंच, आस्वंद, आवार गावातील शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम हातात घेतला. यासाठी ग्रामसेवा सहकारी सोसायटीकडून शेतकऱ्यांची यादी गोळा करीत कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली. या गावांमधील बहुतांश शेतकरी पातुर्डा ग्राम सहकारी सोसायटी व जिल्हा केंद्रीय बँकेच्या पातुर्डा शाखेमार्फत पीककर्ज घेतात.


इतर बातम्या
विदर्भात पूर्वमोसमीचा जोर वाढणार पुणे : हिंद महासागराचा परिसर आणि अरबी समुद्राचा...
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
कृषी निविष्ठा केंद्रे सुरू ठेवण्याचा...सांगली ः जिल्ह्यात १५ मे नंतर लॉकडाउन संपल्यानंतर...
नगर जिल्हा बॅंकेकडून मुख्यमंत्री...नगर ः कोरोना संकटाच्या सामन्यासाठी मदत म्हणून नगर...
बुलडाण्यात शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल...बुलडाणा ः कोरोना संसर्गाची साखळी मोडून...
पारनेर बाजार समितीत कांदा खरेदी-विक्री...नगर ः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पारनेर कृषी...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...पुणे ः राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
समूह सहायक, कृषी सहायकांनी पोकराच्या...अकोला : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पात निवड...
`किमतीची शहानिशा करूनच रासायनिक खते...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांनी बॅगवरील किमतीची शहानिशा...
जळगावात वितरकांकडे कापूस बियाणे दाखल जळगाव ः जिल्ह्यात खरिपासंबंधी शेतकरी जशी उमेदीने...
साखर संघातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस...कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे...
कांदा बियाणे मळणीला खानदेशात आला वेगजळगाव ः खानदेशात कांदा बियाणे मळणी सुरू आहे. मळणी...
नांदेड जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यूनांदेड : जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने मागील काही...
एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना अनेक...सोलापूर : शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच...
हळदीच्या मुल्यसाखळीचा अभ्यास करावा ः...हिंगोली ः ‘‘शेतकऱ्यांनी हळद पिकाच्या मुल्यसाखळीचा...
नाशिकमध्ये पूर्वमोसमी पावसाचा ४५९...नाशिक : जिल्ह्याच्या विविध भागात एप्रिल...