agriculture news in Marathi jagerry rate increased by 150 rupees Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी वाढ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जानेवारी 2021

बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर गुळाच्या दरात क्विंटलला १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली. गुळास दर्जानुसार ३००० ते ४२०० रुपयांपर्यंत दर होता.

कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर गुळाच्या दरात क्विंटलला १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली. गुळास दर्जानुसार ३००० ते ४२०० रुपयांपर्यंत दर होता. गुळाच्या आवकेतही वाढ झाली होती. या कालावधीत गुळाची दररोज सरासरी आवक २५ हजार रवे इतकी होती. संक्रांतीच्या कालावधित दररोज सरासरी दोन ते चार हजार गूळ रव्यांची जादा आवक झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

संक्रांतीसाठी तिळगुळाच्या वड्या व अन्य खाद्य पदार्थ गुळापासून तयार केले जातात. यासाठी गुळाची मागणी या कालावधीत वाढते. यंदा रसायनविरहित गुळाची आवक संक्रांतीच्या दरम्यान वाढली. संक्रांतीच्या अगोदर दोन दिवसांपर्यंत गुळाची मागणी स्थानिक भागातील विक्रेत्यांकडूनही राहिली. याचा परिणाम दराच्या वाढीवर झाल्याचे बाजार समितीच्या 
सूत्रांनी सांगितले.

गुळाचे दर (रुपये/क्विंटल)

दर्जा सरासरी दर 
स्पेशल   ४२००
 ३९५०
३६५०
३४००
४   ३०००

प्रतिक्रिया
संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व दर्जाच्या गुळाच्या दरात क्विंटलमागे शंभर ते दीडशे रुपयांची वाढ झाली. संक्रांतीच्या अगोदर आठ दिवसांपासून संक्रांत होईपर्यंत दरात वाढ होती.
- जयवंत पाटील, सचिव, कोल्हापूर बाजार समिती
 


इतर अॅग्रो विशेष
दावा अन् वास्तवशेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या...
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
एकत्र या अन् ठरवा भावसातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कोबीला...
अद्ययावत ‘मंडी’चे स्वप्न!दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला...नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या...
राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्पपुणे : राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना...
वंचित शेतकऱ्यांसाठी राज्यांनी पुढाकार...पुणे : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील...
राज्यात थंडीत किंचित वाढपुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र...
रत्नागिरी हापूस पोहोचला लंडनलारत्नागिरी ः लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस यूके आणि...
रब्बी ज्वारीचा हुरडा वाण विकसितपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
५० वर्षांच्या वृक्षाचे पर्यावरणीय मूल्य...साधारणतः आपण कुठल्याही वस्तूचे मूल्यमापन विविध...
कोकणात ढगाळ वातावरण पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रिय...
उन्हाळ कांद्याची बाजारात ‘एन्ट्री’ नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ...
‘पीएम-किसान’मध्ये महाराष्ट्राचा डंका पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत (पीएम-...