भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
बाजारभाव बातम्या
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी वाढ
बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गुळाच्या दरात क्विंटलला १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली. गुळास दर्जानुसार ३००० ते ४२०० रुपयांपर्यंत दर होता.
कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गुळाच्या दरात क्विंटलला १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली. गुळास दर्जानुसार ३००० ते ४२०० रुपयांपर्यंत दर होता. गुळाच्या आवकेतही वाढ झाली होती. या कालावधीत गुळाची दररोज सरासरी आवक २५ हजार रवे इतकी होती. संक्रांतीच्या कालावधित दररोज सरासरी दोन ते चार हजार गूळ रव्यांची जादा आवक झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
संक्रांतीसाठी तिळगुळाच्या वड्या व अन्य खाद्य पदार्थ गुळापासून तयार केले जातात. यासाठी गुळाची मागणी या कालावधीत वाढते. यंदा रसायनविरहित गुळाची आवक संक्रांतीच्या दरम्यान वाढली. संक्रांतीच्या अगोदर दोन दिवसांपर्यंत गुळाची मागणी स्थानिक भागातील विक्रेत्यांकडूनही राहिली. याचा परिणाम दराच्या वाढीवर झाल्याचे बाजार समितीच्या
सूत्रांनी सांगितले.
गुळाचे दर (रुपये/क्विंटल)
दर्जा | सरासरी दर |
स्पेशल | ४२०० |
१ | ३९५० |
२ | ३६५० |
३ | ३४०० |
४ | ३००० |
प्रतिक्रिया
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सर्व दर्जाच्या गुळाच्या दरात क्विंटलमागे शंभर ते दीडशे रुपयांची वाढ झाली. संक्रांतीच्या अगोदर आठ दिवसांपासून संक्रांत होईपर्यंत दरात वाढ होती.
- जयवंत पाटील, सचिव, कोल्हापूर बाजार समिती
- 1 of 67
- ››