agriculture news in marathi, jagery in agri produce mortgage scheme On an experimental basis, Maharashtra | Agrowon

गुळासाठीची शेतमाल तारण योजना यंदा प्रायोगिक तत्त्वावर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018
  • या योजनेत जास्तीत जास्त गूळ उत्पादकांनी भाग घ्यावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. बाजार समित्यांनाही सूचना दिल्या आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांतील बाजार समित्यांनी यात सहभाग घ्यावा, यासाठी आम्ही तातडीने बैठकांचे आयोजन करीत आहोत. 

- सुभाष घुले,  उपसरव्यवस्थापक, पणन मंडळ, कोल्हापूर विभाग

कोल्हापूर :  शेतमाल तारण योजनेत अखेर गुळाचा समावेश झाला आहे. यंदाच्या हंगामात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. ज्या भागात गुळाचे उत्पादन होते त्या भागात पणन मंडळाच्या वतीने बाजार समित्यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या हंगामापासूनच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी पणनमंडळ प्रयत्नशील आहे. ही योजना राबविण्यास बाजार समित्यांनी टाळाटाळ केल्यास जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून संबंधित बाजार समित्यांवर कारवाई करण्याच्या विचारात पणन मंडळ आहे. 

शेतमाल तारण योजना शासनाने जाहीर केली; परंतु त्यामध्ये गुळाचा समावेश नसल्याने याचा कोणताही फायदा राज्यातील गूळ उत्पादकांना होत नव्हता. गूळ हा प्रक्रियायुक्त शेतमालाच्या वर्गात मोडत असल्याने पहिल्या टप्प्यात शासनाने या योजनेतून गुळाला वगळले. निकषात बसत नसले तरी गूळ उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या फारसा सक्षम नसल्याने या योजनेत गुळाचा समावेश करावा अशी मागणी होत होती. याचा विचार करून पणनमंडळाने हा विषय संचालक मंडळ सभेत घेऊन याबाबत चर्चा करून प्रायोगिक तत्त्वावर गुळाचा यात समावेश करण्याचा निर्णय घेतला. 

यंदापासून प्रभावी अंमलबजावणीचे प्रयत्न 
या योजनेचा तातडीने लाभ होण्यासाठी पणनमंडळाने यंदापासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ज्या भागात गुळाची खरेदी-विक्री होते. त्या बाजार समित्यांना याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. १५ डिसेंबरपूर्वी बाजार समित्यांनी याबाबतचा प्रस्ताव पणनमंडळाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या आहेत अटी ​

  • ५० टक्के निधी बाजार समितीने द्यावा 
  • उर्वरित रक्कम पणन मंडळ देणार 
  • गुळाकरिता अडीच महिन्यांसाठी ७० टक्के मर्यादेत तारण कर्ज देण्यात यावेत 
  • या मुदतीत शेतकऱ्याने परतफेड न केल्यास गुळाची विक्री बाजार समितीने करावी 
  • गुळाचे लॅब टेस्टिंग आवश्‍यक 
  • गुळासाठी शीतगृहाची सुविधा बाजार समित्यांनी उपलब्ध करून द्यावी 
  • तारणाच्या आवश्‍यक गुळाची जबाबदारी बाजार समित्यांची 
  •  

इतर अॅग्रो विशेष
अनुदान नव्हे; योगदानच वाचवेल शेतीलावातावरण बदल आणि कोसळणाऱ्या पाऊस धारा अथवा कडक...
साखर निर्यातीची सुवर्णसंधीपावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ शकलेल्या साखर...
कापूस लोकायची लाज राखते; पण आमचं काय? यवतमाळ : ‘‘आमच्या कापसापासून तयार कपड्यानं आमी...
कंपोस्ट खते बनविण्याच्या पद्धतीजमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा...
एकदम बाजार समित्या बरखास्त करू नका:...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...
पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची...औरंगाबाद : लिंबूवर्गीय फळपिकात 'राजा' पीक म्हणून...
आंतरराष्ट्रीय द्राक्ष चर्चासत्र आजपासूनपुणे: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन (एनआरसीजी)...
राज्यात पीकहानी ७० लाख हेक्टरच्याही...पुणे : केंद्र शासनाला पाठविल्या जाणाऱ्या अहवालात...
राज्यात गारठा वाढला; नगर १२.१ अंशावरपुणे : किमान तापमानात घट होत असल्याने राज्यात...
साखर कारखान्यांसाठी कर्ज परतफेडीचा...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने साखर कारखान्यांसाठी...
दोडका पिकाने उंचावले अर्थकारणधामणखेल (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील चंद्रकांत...
पेरू विक्रीसाठी प्रसिद्ध पेरणे फाटापुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्यांच्या...
जळगावचे उडीद मार्केट यंदा पोचले...उडीद उत्पादनात खानदेश अग्रेसर आहे. जळगावच्या...
पर्यायाविना निर्णय घातकच! ऑ नलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक...
नैसर्गिक आपत्तीपासूनचा धडा काही वेदनांमधून सुखद आनंदप्राप्ती होते, तर काही...
किमान तापमानात किंचित वाढपुणे  : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर...
बाजार समित्यांना सक्षम पर्याय द्याः...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
पावसाने संत्र्यात ४० टक्के फळगळ; ४००...नागपूर : राज्याचे मुख्य फळपिकांत महत्त्वाचे स्थान...
हमीभावाने कापूस खरेदी २० नोव्हेंबरपासून...जळगाव : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व...
बारा लाख टन साखर निर्यातीचा मार्ग मोकळापुणे : केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे देशातील...