कोल्हापुरात गुळाच्या आवकेत तीस टक्क्‍यांची घट 

यंदा कोल्हापूरबरोबर सांगली, कर्नाटक भागातील गुळाची खरेदीही व्यापाऱ्यांकडून होत आहे. यामुळे गूळ कमी असूनही कोल्हापुरी गुळाची मागणी फारशी वाढली नाही. यामुळेच दरात फारशी वाढ नाही. हंगाम संपताना दरात काहीशी वाढ अपेक्षित आहे. - निमेश वेद, गूळ व्यापारी, कोल्हापूर
jagry
jagry

कोल्हापूर: येथील बाजार समितीत गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा गुळाची आवक सुमारे तीस टक्क्यांपर्यंत घटली आहे. दरात मात्र अपेक्षित वाढ झाली नाही. सध्या गुळाचे दर प्रतिक्विंटल ३२०० ते ४३०० इतके आहेत. पूर व अतिवृष्टीने नुकसान झाल्याने गुळाचा दर्जावर परिणाम होत असल्याने दर फारसे वाढत नसल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  जिल्ह्यात गूळ हंगाम सुरू होऊन महिन्याचा कालावधी लोटला आहे. यंदा पहिल्यापासूनच गुळाची आवक कमी राहिली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या दरम्यान दररोज पंचवीस हजार गूळ रव्यापेक्षा जास्त आवक बाजार समितीत होत होती.  यंदा हीच आवक कशी तरी पंधरा हजार गूळ रव्यापर्यंत होत आहे. यंदा हीच परिस्थिती हंगाम संपेपर्यंत राहील, अशी शक्‍यता बाजार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली. १ एप्रिल २०१९ ते २३ डिसेंबरअखेर ७ लाख गूळ रव्याची आवक झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक तीस टक्क्यांपर्यंत घटली आहे. याचा स्पष्ट परिणाम बाजारपेठेतील उत्साहावर दिसून येत आहे. वाफसा चांगला असल्याने येत्या महिन्याभरात जलदगतीने गुऱ्हाळे सुरू होवून आवकेत किंचित वाढ होईल, असा अंदाज गूळ बाजारातील सूत्रांनी व्यक्त केला. 

कोल्हापूर बाजार समितीत गुळाला मिळणारा दर (क्विंटल) रुपयांत 

प्रत किमान कमाल सरासरी 
स्पेशल ४४०० ४६०० ४५०० 
क्र.१ ४२०० ४३९० ४३०० 
क्र.२ ३८५० ४१९० ४००० 
क्र.३ ३४०० ३८४० ३७०० 
क्र.४ ३१०० ३३९० ३२०० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com