agriculture news in Marathi jagery arrival down to 30 percent in Kolhapur Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात गुळाच्या आवकेत तीस टक्क्‍यांची घट 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 डिसेंबर 2019

यंदा कोल्हापूरबरोबर सांगली, कर्नाटक भागातील गुळाची खरेदीही व्यापाऱ्यांकडून होत आहे. यामुळे गूळ कमी असूनही कोल्हापुरी गुळाची मागणी फारशी वाढली नाही. यामुळेच दरात फारशी वाढ नाही. हंगाम संपताना दरात काहीशी वाढ अपेक्षित आहे. 
- निमेश वेद, गूळ व्यापारी, कोल्हापूर 

कोल्हापूर: येथील बाजार समितीत गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा गुळाची आवक सुमारे तीस टक्क्यांपर्यंत घटली आहे. दरात मात्र अपेक्षित वाढ झाली नाही. सध्या गुळाचे दर प्रतिक्विंटल ३२०० ते ४३०० इतके आहेत. पूर व अतिवृष्टीने नुकसान झाल्याने गुळाचा दर्जावर परिणाम होत असल्याने दर फारसे वाढत नसल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यात गूळ हंगाम सुरू होऊन महिन्याचा कालावधी लोटला आहे. यंदा पहिल्यापासूनच गुळाची आवक कमी राहिली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या दरम्यान दररोज पंचवीस हजार गूळ रव्यापेक्षा जास्त आवक बाजार समितीत होत होती. 

यंदा हीच आवक कशी तरी पंधरा हजार गूळ रव्यापर्यंत होत आहे. यंदा हीच परिस्थिती हंगाम संपेपर्यंत राहील, अशी शक्‍यता बाजार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली. १ एप्रिल २०१९ ते २३ डिसेंबरअखेर ७ लाख गूळ रव्याची आवक झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक तीस टक्क्यांपर्यंत घटली आहे. याचा स्पष्ट परिणाम बाजारपेठेतील उत्साहावर दिसून येत आहे. वाफसा चांगला असल्याने येत्या महिन्याभरात जलदगतीने गुऱ्हाळे सुरू होवून आवकेत किंचित वाढ होईल, असा अंदाज गूळ बाजारातील सूत्रांनी व्यक्त केला. 

कोल्हापूर बाजार समितीत गुळाला मिळणारा दर (क्विंटल) रुपयांत 

प्रत किमान कमाल सरासरी 
स्पेशल ४४०० ४६०० ४५०० 
क्र.१ ४२०० ४३९० ४३०० 
क्र.२ ३८५० ४१९० ४००० 
क्र.३ ३४०० ३८४० ३७०० 
क्र.४ ३१०० ३३९० ३२०० 

 


इतर अॅग्रोमनी
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...