agriculture news in Marathi jagery has demand in corona Maharashtra | Agrowon

कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायम

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या गूळ हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त उलाढाल झाली आहे.

कोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या गूळ हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त उलाढाल झाली आहे. नुकताच गूळ हंगाम संपला असून, कोल्हापूर बाजार समितीत या हंगामात २१२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. गेल्या हंगामाच्या तुलनेत या हंगामात सरासरी दरातही क्विंटलला १०० रुपयांनी वाढ झाली.

ऑक्टोबरमध्ये सुरू झालेला गूळ हंगाम यंदा मे महिन्यापर्यंत चालला. अखेरच्या टप्प्यात ‘कोरोना’मुळे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात तयार होणाऱ्या गुळाला कर्नाटक व सांगली भागातील गुळाच्या तुलनेत जादा मागणी राहिली. याचा सकारात्मक परिणाम अखेरच्या टप्प्यात गूळ दर वाढीवर झाला.

महापूर येऊन गेल्यानंतर गुळाच्या उत्पादनात घट होईल असा अंदाज होता. परंतु, साखर कारखान्यांप्रमाणे गूळ हंगामही मे महिन्यापर्यंत सुरू राहिला. ‘कोरोना’मुळे सर्वत्र गूळ वाहतुकीला मोठा फटका बसला. गुळाच्या कोल्हापूर व्यतिरिक्त कर्नाटक व अन्य जिल्ह्यांतील बाजारपेठा बंद झाल्या, तसेच त्या भागातील गुऱ्हाळेही बंद राहिली. यामुळे अखेरच्या टप्प्यात गुजरातमधून कोल्हापुरी गुळाला चांगली मागणी राहिली. परिणामी दरात वाढ होती गेली.

यंदाच्या हंगामात कोल्हापूर बाजार समितीत सहा लाख ३२ हजार क्विंटल गुळाची आवक झाली. यातून २१२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. गुळाला सरासरी ३४०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा गुळाला समाधानकारक दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. प्रत्येक वर्षी मार्च, एप्रिलपर्यंत गूळ हंगाम चालतो. यंदा मे महिन्यापर्यंत गुऱ्हाळे सुरू होती. वेगवेगळ्या वजनाच्या २१ लाख ७ हजार ७९७ गूळ रव्यांची आवक बाजार समितीत झाली.

प्रतिक्रिया
महापुरामुळे ऊस पिकाचे झालेले नुकसान पाहता यंदा गूळ उत्पादन कमी होईल, असा अंदाज होता. परंतु, यंदा गूळ आवकेत घट झाली नसल्याचे दिसले.
- मोहन सालपे, सचिव, बाजार समिती, कोल्हापूर.

‘कोरोना’मुळे व्यापाऱ्यांकडे गूळ हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात कर्नाटक व इतर बाजारपेठेतून होणारी गुळाची आवक कमी राहिली. यामुळे साहजिकच शेवटच्या टप्प्यात असलेल्या कोल्हापूरच्या गूळ हंगामाला याचा फायदा झाला. व्यापाऱ्यांनी कोल्हापुरी गुळाच्या खरेदीला प्राधान्य दिले. परिणामी दरात वाढ झाली. 
- निमेश वेद, गूळ व्यापारी.
 


इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...