दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
अॅग्रो विशेष
शिराळा तालुक्यात गुऱ्हाळघरांना उशिरा प्रारंभ
शिराळा तालुक्यात यंदा गूळ उत्पादनाचा हंगामास उशिरा सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षांत गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे पाठ फिरवल्याचे दिसते आहे.
सांगली ः शिराळा तालुक्यात यंदा गूळ उत्पादनाचा हंगामास उशिरा सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षांत गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे पाठ फिरवल्याचे दिसते आहे. अतिवृष्टीचा फटका ऊस पिकाला बसल्याने मालकांनी गुऱ्हाळघरे सुरूच केली नाहीत. यंदाच्या हंगामातही दोन गुऱ्हाळघरे सुरू झाली असून, अजून तीन ते चार गुऱ्हाळघरे सुरू होतील, असा अंदाज गुऱ्हाळघर मालकांनी व्यक्त केला आहे.
शिराळा तालुक्यात शिराळा तालुक्यात ८ हजार १४५ हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात गुऱ्हाळघरे सुरू होतात. मालकांनी गुऱ्हाळघरे सुरू करण्यासाठी नियोजन सुरू केले. मजुरांची उपलब्धता यंत्राची दुरुस्ती यांसह अन्य कामे पूर्ण केली होती. गत हंगामात महापुराचा फटका गुऱ्हाळघरांना बसला होता. त्यातूनही गुऱ्हाळघर मालकांनी गुऱ्हाळघरांची दुरुस्ती करून गूळ उत्पादन सुरू केले. सध्या शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे एक गुऱ्हाळ घर सुरू झाले आहे. यंदा गुऱ्हाळ घरासाठी पुरेसा ऊस उपलब्ध असल्याने गुऱ्हाळ घरांची संख्या वाढेल, अशी आशा होती.
मात्र ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टी झाली. यामुळे उसावर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्याचा फटका उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता आजही तालुक्यातील पश्चिम भागात ऊस पिकामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणारी गुऱ्हाळघरे सुरू करण्यासाठी हालचाली केलेल्या नाहीत. दसऱ्याला सुरू होणारी गुऱ्हाळघरे एका महिन्याने सुरू झाली. सध्या गुऱ्हाळ घरे सुरू झाली असली, तरी गेल्या दोन वर्षांत गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी गूळ उत्पादनाकडे पाठ फिरवली आहे.
प्रतिक्रिया
गेल्या दोन वर्षांपासून गुऱ्हाळघरांवर संकटांची मालिका सुरू आहे. यंदा तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले असले, तरी अतिवृष्टीचा फटका या उद्योगाला बसला आहे. तसेच गुळाला अपेक्षित दर नसल्याने गूळ तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
- संजय नांगरे, गुऱ्हाळघर मालक, कोकरूड, ता. शिराळा
- 1 of 654
- ››