agriculture news in Marathi jagery home started late Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शिराळा तालुक्यात गुऱ्हाळघरांना उशिरा प्रारंभ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

शिराळा तालुक्यात यंदा गूळ उत्पादनाचा हंगामास उशिरा सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षांत गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे पाठ फिरवल्याचे दिसते आहे. 

सांगली ः शिराळा तालुक्यात यंदा गूळ उत्पादनाचा हंगामास उशिरा सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षांत गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे पाठ फिरवल्याचे दिसते आहे. अतिवृष्टीचा फटका ऊस पिकाला बसल्याने मालकांनी गुऱ्हाळघरे सुरूच केली नाहीत. यंदाच्या हंगामातही दोन गुऱ्हाळघरे सुरू झाली असून, अजून तीन ते चार गुऱ्हाळघरे सुरू होतील, असा अंदाज गुऱ्हाळघर मालकांनी व्यक्त केला आहे.

शिराळा तालुक्यात शिराळा तालुक्यात ८ हजार १४५ हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात गुऱ्हाळघरे सुरू होतात. मालकांनी गुऱ्हाळघरे सुरू करण्यासाठी नियोजन सुरू केले. मजुरांची उपलब्धता यंत्राची दुरुस्ती यांसह अन्य कामे पूर्ण केली होती. गत हंगामात महापुराचा फटका गुऱ्हाळघरांना बसला होता. त्यातूनही गुऱ्हाळघर मालकांनी गुऱ्हाळघरांची दुरुस्ती करून गूळ उत्पादन सुरू केले. सध्या शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे एक गुऱ्हाळ घर सुरू झाले आहे. यंदा गुऱ्हाळ घरासाठी पुरेसा ऊस उपलब्ध असल्याने गुऱ्हाळ घरांची संख्या वाढेल, अशी आशा होती.

मात्र ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टी झाली. यामुळे उसावर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्याचा फटका उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता आजही तालुक्यातील पश्‍चिम भागात ऊस पिकामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणारी गुऱ्हाळघरे सुरू करण्यासाठी हालचाली केलेल्या नाहीत. दसऱ्याला सुरू होणारी गुऱ्हाळघरे एका महिन्याने सुरू झाली. सध्या गुऱ्हाळ घरे सुरू झाली असली, तरी गेल्या दोन वर्षांत गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी गूळ उत्पादनाकडे पाठ फिरवली आहे.

प्रतिक्रिया
गेल्या दोन वर्षांपासून गुऱ्हाळघरांवर संकटांची मालिका सुरू आहे. यंदा तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले असले, तरी अतिवृष्टीचा फटका या उद्योगाला बसला आहे. तसेच गुळाला अपेक्षित दर नसल्याने गूळ तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
- संजय नांगरे, गुऱ्हाळघर मालक, कोकरूड, ता. शिराळा


इतर अॅग्रो विशेष
केंद्राच्या स्पष्ट धोरणाअभावी ‘जीएम’...नागपूर ः एकीकडे जनुकीय सुधारित (जीएम) पिकांच्या...
लोक सहभागातून जैवविविधता, पर्यावरण...ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पाच...
अपात्र लाभार्थ्यांना कोणी केले मालामाल?ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला...
ग्लोबल अन् लोकल मार्केटमका आणि सोयाबीनच्या जागतिक उत्पादनात घट होण्याची...
निर्णय आता तुमच्या हाती : केंद्र सरकारनवी दिल्ली ः शेतकरी नेते ‘कृषी कायदे रद्द करणे...
शेतमाल निर्यात खर्च झाला दुप्पट नाशिक : लंडनमध्ये डिसेंबरअखेर कोरोनाचा नव्या...
बर्ड फ्लूने १३ हजार पक्ष्यांचा मृत्यू पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू...
कृषिपंपाच्या थकबाकीची आता ऊसबिलातून...सोलापूर :  कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी आणि...
थंडी कायम राहण्याची शक्यता पुणे ः कोरड्या झालेल्या वातावरणामुळे राज्यातील...
चॉकलेट्‌स......नव्हे गुळाचे जॅगलेट्‌सकोल्हापुरी प्रसिद्ध गूळ देश-परदेशातील बाजारपेठेचा...
‘जय सरदार’ कंपनीची उल्लेखनीय घोडदौडमलकापूर (जि. बुलडाणा) येथील ‘जय सरदार’ शेतकरी...
‘कनेक्शन कट’चे कारस्थान!बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (...
कापसाचा शिल्लक साठा बाहेर पाठवा कोरोना संक्रमण काळातील सुरुवातीचे तीन-चार महिने...
शेतकरी मागण्यांवर ठाम; ट्रॅक्टर रॅलीही...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्‍टर...
बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री...नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा...
एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी...अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला...
कापूस उत्पादकतावाढीसाठी ‘सीआयसीआर’चा ॲ...नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास उशीरसांगली ः जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी...
आजरा घनसाळसह तूरडाळ, घेवडा मिळणार...कोल्हापूर : पारंपरिक विक्री व्यवस्थेच्या पलीकडे...
थंडीत चढ-उतार सुरुच पुणे ः हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी...