सांगलीत गूळ ३२०० ते ४०४५ रुपये प्रतिक्विंटल

jaggery 3200 to 4050 per quintal in Sangli
jaggery 3200 to 4050 per quintal in Sangli

सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १४) गुळाची ४५५७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३२०० ते ४०४५ तर सरासरी ३६२८ रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत लाल मिरचीची १३९ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १०,००० ते १६०००, तर सरासरी १३,००० हजार असा दर होता. विष्णूअण्णा पाटील दुय्यम बाजार आवारात कांद्याची २२०८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रति क्विंटल १५०० ते ४००० रुपये असा दर मिळाला.

बटाट्याची ३६३ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रति क्विंटल १४०० ते २४०० असा दर होता. लसणाची १७६ क्विंटल आवक, तर  ७००० ते ११००० असा दर मिळाला. बोरांची १५४ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रति क्विंटल ५०० ते २००० रुपये असा दर होता. डाळिंबांची १७ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रति क्विंटल १५०० ते १०००० असा दर मिळाला. सफरचंदांची ८० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रति क्विंटल ४००० ते ८०००असा दर मिळाला. कलिंगडाची २५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रति क्विंटल १५०० ते ३००० रुपये असा दर होता.

शिवाजी मंडईत वांग्यांच्या १५० बॉक्‍सची आवक झाली. त्यांना प्रति दहा किलोस ३०० ते ६०० रुपये असा दर मिळाला. सिमला मिरचीची १२० पिशव्यांची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस १०० ते २०० रुपये असा दर होता. दोडक्‍याची २५ बॉक्‍सची आवक झाली होती. दोडक्‍यास प्रति दहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. पावट्याची ७० पिशवीची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस ५०० ते ८०० रुपये असा दर होता. कांदापातीची २००० पेंड्याची आवक झाली. त्यास प्रति शेकडा १५०० ते २००० दर मिळाला.

कोथिंबिरीची ८००० पेंड्यांची आवक

कोथिंबिरीची ८००० पेंड्यांची आवक झाली होती. तिला प्रति शेकडा ३०० ते ४०० असा दर होता. पालकाची २००० पेंड्याची आवक झाली. त्यास प्रति शेकड्यास ३०० ते ४०० असा दर मिळाला. चाकवतीची १००० पेंड्यांची आवक झाली. त्यास प्रति शेकड्यास ८०० ते ११०० रुपये असा दर मिळाला. टोमॅटोची १८० क्रेट आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस  १०० ते १३० असा दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com