agriculture news in marathi jaggery auction regularize kolhapur maharashtra | Agrowon

गूळ सौदे सुरू करण्यासाठी दोन्ही घटकांना दिली समज...

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

कोल्हापूर  : गेल्या दोन दिवसांपासून व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये सुरू असलेल्या हमाली दरवाढीच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. दहा टक्के हमाल वाढीचे पत्र व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे सुपूर्त केल्यांनतर बुधवारी (ता. २०) सकाळपासून गूळ सौदे नियमित सुरू झाले.

कोल्हापूर  : गेल्या दोन दिवसांपासून व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये सुरू असलेल्या हमाली दरवाढीच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. दहा टक्के हमाल वाढीचे पत्र व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे सुपूर्त केल्यांनतर बुधवारी (ता. २०) सकाळपासून गूळ सौदे नियमित सुरू झाले.

बुधवारी नऊ हजार गूळ रव्यांची आवक झाली. या वेळी गुळाला सरासरी ३७०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून हमाली दरवाढीच्या मुद्यावरून बाजार समितीचे गूळ आवार व्यापारी आणि हमाल यांच्या संघर्षाने धुमसत होते. सोमवारी सकाळी यातूनच वाद होऊन सौदे बंद पडले. शेतकऱ्यांनीही आक्रमक भूमिका घेत तुमच्या वादात आमचे नुकसान कशासाठी असे सांगत बाजार समितीतील वाहतूक बंद केली. सोमवारी बैठक होऊन वाढीबाबतचे पत्र देण्याबाबतचा निर्णय झाला.

मंगळवारी दिवसभर अडेलतटट्टूपणाची भूमिका व्यापारी व माथाडी कामगारांनी घेतली. सायंकाळी पुन्हा बाजार समितीच्या संचालकांची बैठक होऊन मार्ग काढण्याबाबत चर्चा झाली. सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबरही संचालक मंडळानी चर्चा केली. या वेळी कोणत्याही परिस्थितीत वाद मिटविण्याचा इशारा नेत्यांनी दिल्यानंतर सौदे सुरू करण्याबाबत दोन्ही घटकांना समज देण्यात आली. 
व्यापाऱ्यांनी दहा टक्के वाढीचे पत्र दिले असून, बुधवारी सकाळपासून नियमित सौदे सुरू झाल्याची, माहिती बाजार समितीचे सचिव मोहन सालपे यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...