agriculture news in marathi, jaggery auction stop due to agitation, kolhapur, maharashtra | Page 2 ||| Agrowon

हमाली दरवाढीवरून कोल्हापुरात गूळ सौदे बंद

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

कोल्हापूर : खरेदीदार व माथाडी कामगारांच्या हमाली दरवाढीवरून सौदे बंद पडले. सौदे बंद पाडून आमचे नुकसान का करता, असा संतप्त सवाल करीत सोमवारी (ता.१८) गूळ उत्पादकांनी बाजार समितीचे सर्व दरवाजे बंद करून वाहतूक रोखली आणि ठिय्या आंदोलन केले.

बाजार समितीच्या पुढाकाराने खरेदीदार, माथाडी कामगारांच्या चार ते पाच तास सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतरही सायंकाळी पाच वाजेपर्यंत दरवाढीबाबत तोडगा निघू शकला नाही. पोलिसांनी संबंधितांची एकत्रित बैठक घेत अगोदर वाहतूक सुरळीत करा, नंतर चर्चा करा, असे सुनावल्यानंतर दुपारी एकच्यादरम्यान वाहतूक सुरळीत झाली. 

कोल्हापूर : खरेदीदार व माथाडी कामगारांच्या हमाली दरवाढीवरून सौदे बंद पडले. सौदे बंद पाडून आमचे नुकसान का करता, असा संतप्त सवाल करीत सोमवारी (ता.१८) गूळ उत्पादकांनी बाजार समितीचे सर्व दरवाजे बंद करून वाहतूक रोखली आणि ठिय्या आंदोलन केले.

बाजार समितीच्या पुढाकाराने खरेदीदार, माथाडी कामगारांच्या चार ते पाच तास सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतरही सायंकाळी पाच वाजेपर्यंत दरवाढीबाबत तोडगा निघू शकला नाही. पोलिसांनी संबंधितांची एकत्रित बैठक घेत अगोदर वाहतूक सुरळीत करा, नंतर चर्चा करा, असे सुनावल्यानंतर दुपारी एकच्यादरम्यान वाहतूक सुरळीत झाली. 

गेल्या काही दिवसांपासून माथाडी कामगार व गूळ व्यापाऱ्यांमध्ये हमाली दरवाढीवरून संघर्ष सुरू आहे. यातून तोडगा म्हणून बाजार समितीच्या मध्यस्थीने व्यापाऱ्यांनी दहा टक्के दरवाढ द्यावी आणि पुन्हा तीन वर्षे माथाडी कामगारांनी वाढ मागू नये, असे पत्र देत सौदे सुरू करण्याबाबत आवाहन केले होते. पण हा निर्णय माथाडी कामगारांना मान्य नव्हता. पुढील तीन वर्षे वाढ नाही ही अट काढावी, अशी त्यांनी मागणी केली. परंतु व्यापाऱ्यांनी मात्र या अटीवरच वाढ देत असल्याचे सांगत ताठर भूमिका घेतली. याचे पर्यावसान सोमवारी गूळ सौदे बंद होण्यावर झाले. गूळ सौदे झाल्याने गूळ उत्पादकांनी गोंधळ घालण्यास प्रारंभ केला.

भगवान काटे, बाबासाहेब पाटील आदींसह गूळ उत्पादकांनी या कृतीचा निषेध नोंदविला. चारही प्रवेशद्वारांवर गुळाची वाहने लावून वाहतूक बंद करण्यात आली. अचानक वाहतूक बंद केल्याने भाजीपाल्यासह कांदा बटाट्याची वाहतूकही ठप्प झाली. याचदरम्यान शाहूपुरी मर्चंटस असोसिएशन येथे व्यापाऱ्यांनी बैठक घेतली. सकाळी अकराच्या सुमारास पोलिस दाखल झाल्यानंतर त्यांनी बाजार समितीत सर्व घटकांना बोलावून चर्चा घडवून आणली. 

शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, बाजार समितीचे सभापती बाबासाहेब लाड, सचिव मोहन सालपे, शाहूपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जसवंत शहा, भगवान काटे, माथाडी कामगार प्रतिनिधी बाबूराव खोत यांच्यात बैठक झाली. अडेलतट्टूपणाची भूमिका घेत सर्व घटक आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने श्री. कटकधोंड यांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. जिल्हा पोलिसप्रमुख अभिनव देशमुख यांच्याशी चर्चा केली. कोणताही निर्णय घ्या, परंतु वाहतूक सोडा, असे आवाहन त्यांनी केले.

सौदे मंगळवारपासून (ता.१९) सुरू करण्याच्या आश्‍वासनानंतर गूळ उत्पादकांनी आंदोलन मागे घेतले तरीही बाजार समितीत चर्चा सुरूच होती. दहा टक्के वाढीचे पत्र व्यापाऱ्यांनी द्यावे, यानंतर गुढीपाडव्याला परत बैठक घेऊन पुढील निर्णय घ्यावा, असे आवाहन बाजार समितीने केले. व्यापाऱ्यांनी पत्र देतो. परंतु तीन वर्षे वाढीची अट तशीच राहणार, असे सांगत याला मोडता घालण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी पाचपर्यंत तरी याबाबत समाधानकारक तोडगा निघाला नाही. 


इतर ताज्या घडामोडी
आदिवासी बेरोजगारांसाठी औषधी वनस्पतीवरील...कर्जत, जि. रायगड : आदिवासींच्या उत्कर्षासाठी...
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी...नाशिक : नाशिक व नगर जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्र...
सोयाबीन उत्पादकांना भरपाई द्यावी;...यवतमाळ : जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटल्याने...
वाशीम जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरावीवाशीम ः जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील वर्ग एक...
ठाणे जिल्ह्याला बसलेला कुपोषणाचा विळखा...मुंबई : ठाणे जिल्ह्याला कुपोषणाचे लागलेले ग्रहण...
रब्बी पेरणीपूर्वी जल, मृद संधारणसपाट जमिनीवर पेरणी पूर्व बांधणी करण्यासाठी व...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३७५० ते ६८७५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...
जेएनपीटी बंदराच्या खासगीकरणाचे प्रयत्न? मुंबई: उरण परिसरातील जेएनपीटीच्या मालकीच्या एकमेव...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...