Agriculture News in Marathi Jaggery deals closed Disruption persists in Kolhapur | Agrowon

गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायम

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021

गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले जावे, असा सर्वमान्य निर्णय झालेला असतानाही काही मोजक्या व्यापाऱ्यांनी मंगळवारी (ता.१२) बॉक्सचे वजन धरण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा वादाला तोंड फुटले याचा परिणाम गूळ सौदे बंद होण्यास झाला.

कोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले जावे, असा सर्वमान्य निर्णय झालेला असतानाही काही मोजक्या व्यापाऱ्यांनी मंगळवारी (ता.१२) बॉक्सचे वजन धरण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा वादाला तोंड फुटले याचा परिणाम गूळ सौदे बंद होण्यास झाला.

गेल्या आठ दिवसांत चार वेळा सौदे बंद पडल्याने गुळाचा हंगामच वादग्रस्त ठरत आहे. बाजार समितीच्या अशासकीय मंडळ व प्रशासनाने व्यापाऱ्यांना बॉक्सचे वजन धरण्याचा निर्णय झाला आहे, त्याची अंमलबजावणी करावी, असे सूचित केले यानंतर सौदे पूर्ववत सुरू झाले. 

शाहू मार्केट यार्डात गूळ सौद्यामध्ये गूळा सोबत त्याला पॅकिंग केलेल्या बॉक्सचे वजन धरावे, त्याचे पैसेही व्यापाऱ्यांनी द्यावेत. यामागणीवरून व्यापारी शेतकरी यांच्या वाद सुरू आहेत, त्यात शनिवारी झालेल्या बैठकीत बाजार समितीने गुळाच्या बॉक्सचे वजन धरावे, अशी सूचना व्यापाऱ्यांना केली होती. त्यानुसार  मंगळवारी (ता. १२) गुळ सौद्यांना सुरवात झाली. ३६०० रुपयांचा सरासरी भाव सौद्यात निघाला, याच वेळी काही व्यापाऱ्यांनी बॉक्सचे पैसे देण्यास किंवा वजन धरण्यास नकार दिला. यावरून वादाला सुरुवात झाली. शेतकरी संतप्त झाले, सौदे बंद पडले. 

गदारोळ सुरू असतानाच बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील तसेच अशासकीय मंडळाचे सदस्य सौदया ठिकाणी गेले त्यांनी व्यापाऱ्यांना या पूर्वीच्या बैठकीत सांगितल्या प्रमाणे बॉक्सचे वजन धरावे लागेल. त्याचे पैसे द्यावे लागतील असे सांगितले. यावेळी काही व्यापाऱ्यांनी विरोध केला तर शेतकऱ्यांनी बॉक्सचे वजन धरा असा पवित्रा घेतला. यातही पुन्हा वाद झाला. अशासकीय प्रशासक मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील आले त्यांनीही व्यापाऱ्यांना बोलावून घेतले तसेच बाजार समितीने यापूर्वी बॉक्सचे वजन धरा, असे सांगितले आहे. त्याची अंमलबजावणी करावीच लागेल, असे ठामपणे सांगितले त्यानंतर सौदे पुन्हा सुरू झाले.

व्‍यापाऱ्यांसोबत 
आज पुन्हा बैठक 

यंदाच्या गुळ हंगामात गुळाला सरासरी ३६०० ते ३७०० क्विंटलचे भाव आहे. बहुतांशी गुळ गुजरात बाजारपेठेत पाठवला जातो. मात्र तेथेही स्पर्धा असल्याने गुळाची मागणी कमी झाली. त्यामुळे व्यापाऱ्याना पूर्वी सारखा व्यवसाय होत नाही नुकसान होते. त्यामुळे बॉक्सचे पैसेही देणेही परवडत नाही. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्व मुद्यांवर पुन्हा एकदा व्यापारी व अशासकीय मंडळ यांच्यात आज (बुधवारी) चर्चा होणार आहे. मात्र त्यासाठी सौदे बंद करू नयेत, अशी सूचना अध्यक्ष के. पी. पाटील यांनी यावेळी केली.


इतर ताज्या घडामोडी
पांगरीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन...पांगरी, ता. बार्शी ः पीक नुकसानीची तक्रार...
जोरदार पावसाने जेवळी परिसरात तलाव भरले जेवळी, जि. उस्मानाबाद : जेवळी व परिसरात दोन- तीन...
कुसुंबामध्ये शंभर क्विंटल कांदा चाळीतून...कुसुंबा, जि. धुळे ः कुसुंबा येथील शेतकरी सुभाष...
पीकविम्याप्रश्‍नी केंद्र सरकार म्हणणे...उस्मानाबाद : गेल्या वर्षी पीकविमा कंपन्यांनी...
गिरणा पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर कराभडगाव/पाचोरा, जि. जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
हिंगोली जिल्ह्यात बासष्ट हजार क्विंटलवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
साठा मर्यादा निर्णयाची  राज्यात... हिंगणघाट, जि. वर्धा :  केंद्र सरकारने गरज...
`ई-पीक पाहणी चौदा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण...नाशिक : ‘‘शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या...
भारनियमन केले जाणार नाही; वीजनिर्मिती...मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मिती कमी...
पीक पेरा नोंदणीत नांदेड मराठवाड्यात...नांदेड : ‘‘ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत...
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...औरंगाबाद : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
वाशीम जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना ६.७७...वाशीम : जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे या...
संकरित वाणाची होणार सधन पद्धतीने लागवड  नागपूर : सरळ वाणाचा उपयोग करून कापसाची...
द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या...द्राक्ष बागेत ऑक्टोबर फळछाटणीनंतर उडद्या...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
`कुरनूर’मधून २१०० क्युसेकचा विसर्गसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर मध्यम बोरी...
सोलापूर जिल्हा दूध संघावरील प्रशासकाची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
कापूस वेचणीचा खर्च सात रुपये प्रतिकिलोजळगाव ः खानदेशात पावसामुळे पिकांची हानी सुरूच आहे...
खानदेशात एकच केळी दर जाहीर करावाजळगाव ः खानदेशात केळीचे वेगवेगळे दर रोज जाहीर...